google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहर व तालुक्यातील विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईपेक्षा कोरोना टेस्ट करा

Breaking News

सांगोला शहर व तालुक्यातील विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईपेक्षा कोरोना टेस्ट करा

 सांगोला ( प्रतिनिधी ) : सांगोला तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शहराची व्याप्ती पाहता प्रत्येक चौकात विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस यंत्रणा दंडात्मक कारवाई करीत आहे .


दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या कोरोना टेस्ट कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे . नगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून नामी लढवित चौकाचौकात रॅपिड अँटिजेन तपासणी केली तर गर्दीचे प्रमाण कमी झालेले दिसून येईल . कोरोना वाढीचा वाढता प्रभाव लक्षात घेता , पोलीस प्रशासनाची दमछाक होत आहे . त्यात बाधित असलेली व्यक्ती संपर्क लपवू पाहत आहेत . त्यासाठी वेगळीच शक्कल लढविली तर पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचा ताण कमी होऊन रस्त्यावरची वर्दळ कमी होईल.यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून वेळीच पावले उचलली गेली तर सांगोलाशहरातील स्थिती आटोक्यात आणली जाऊ शकते . १५ ते ३० वयोगटांतील वाहनचालक विनाकारण फेरफटका मारताना दिसतात . कारवाई करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत . तर प्रसंगी वादविवाद होताना दिसत आहेत . या नेत्यांचा कार्यकर्ता आहे , तर माझे नातलगही खात्यात आहेत . ' लावू का फोन लावू का ' या पोकळ बोलण्यावरून वाद निर्माण होत आहेत . यासाठी विनात्रास वाहने जप्त करून कारवाई सुद्धा करून रॅपिड अँटिजेन तपासणी करावी म्हणजेबाधित समजतील आणि त्यांची रवानगी तातडीने विलगीकरण कक्षात करावी . तरच लोक विनाकारण फिरणार नाहीत . यासाठी तालुका प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली पाहिजेत असे नागरिक मधून बोलले जात आहे.शहरात कोठेही बेड , ऑक्सिजन मिळत नसून नागरिकांनी आता शासकीय नियमांचे पालन करत घरी बसण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे . सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे , असे सांगण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments