पोटच्या दोन लेकींना ट्रक खाली चिरडले; स्वतःही केली आत्महत्या; करमाळा तालुक्यातील सावडीच्या पित्याचे पुण्यात क्रूरकर्म
पुणे जिल्ह्यातील इंदोरी (ता. मावळ) येथील अल्फानगरी सोसायटीमध्ये राहणारे भरत भराटे याने मुलीच्या प्रेम प्रकरणावरून संशय घेत स्वतः च्या दोन्ही मुलींची ट्रकखाली चिरडून हत्या करत स्वत:आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार इंदोरी येथे दि. १७ च्या मध्यरात्री उघडकीस आला.या प्रकरणी मृत मुलीची आई सपना भरत भराटे (रा. सावडी, ता करमाळा जि. सोलापूर, सध्या राहणार इंदोरी मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. नंदीनी भराटे (वय १८), वैष्णवी भराटे (वय १४) व भरत भराटे (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.मुलीचे कोठे तरी बाहेर प्रेमप्रकरण चालू आहे, असा संशय भरत भराटे याला होता.मुलीच्या अशा वागण्याने नाव खराब होईल, या पेक्षा जीव दिलेला बरा असे त्याने पत्नी सपना यांना सांगितले. असे बोलून भरत भराटे यांनी दोन्ही मुलींना रात्री रस्त्यावर झोपण्यास सांगितले आणि स्वतःच्या मालकीचा ट्रक (एम एच 12 एच डी 1604) चालू करून दोन्ही मुलींच्या अंगावर घालून त्यांना चिरडून त्यांची निर्घृण हत्या केली.त्यानंतर स्वतः देखील चालू ट्रकखाली उडी मारून आत्महत्या केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तर पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे इंदोरी परिसरात खळबळ उडाली आहे.
0 Comments