सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे . कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयात खाटांची संख्या कमी असल्याने गत आठवड्याभरापासून बेड मिळणे कठीण झाले आहे . पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे नातेवाईक या रुग्णालयातून | त्या रुग्णालयात बेडसाठी भटकंती करीत असल्याचे चित्र सांगोला शहरात दिसत आहे .
बेड मिळणे झाल्याने कोविड रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली असून मोबाईलवरून हॅलो ... बेड मिळेल का बेड ? अशी आर्त हाक दिली जात आहे . सांगोला शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . काही अत्यावस्थ रुग्ण शहरासह पंढरपूर , सोलापूर , सांगली , मिरज , अकलूज येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत .पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक गत आठ दिवसांपासून उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेत असल्याचे दिसत आहे . मात्र रुग्णालयात जागा नसल्याने अशा रुग्णांवर घरीच उपचार करण्याची वेळ आली आहे . प्रशासन विविध उपाय योजना करीत असली तरी रुग्णांची संख्या पाहता ती तोकडी ठरत आहे . यासाठी नागरिकांनीच संयम पाळण्याची गरज आहे . कोरोना बाधित रुग्णांना उपचार करताना ऑक्सिजनची सुविधा द्यावी लागत आहे . मात्र प्रचंड मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे . ऑक्सिजन सिलिंडरचे वाहन रुग्णालयात पोहोचले की नातेवाइकांची गर्दी होत आहे . शहरातील खासगी आयसीयू सेंटरमध्ये सुद्धा कोरोनाच्या काही गंभीर रुग्णांवर उपचार केले जात आहेत . मात्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानेबेडसाठी धावाधाव करावी लागत आहे . शहरातील आयसीयू रुग्णालयात सांगोला तालुक्यासह मंगळवेढा , जत , आटपाडी तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने सध्या कुठेहीबेड शिल्लक नसल्याने अडचणी वाढल्या आहेत . ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची तर मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत असल्याने आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे | आहे . वाढत्या रुग्णसंख्येचा ताण आरोग्य प्रशासनावर | येत असून , मनुष्यबळाचा | तुटवडा असल्याने अनेक | अडचणी निर्माण झाल्या | आहेत . ज्यांना उपचारासह | ऑक्सिजनची गरज आहे . त्यांना सध्या बेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला | मोठी कसरत करावी लागत | आहे . ऑक्सिजन किंवा | व्हेंटीलेटरवर गेलेला रुग्ण बरा | होण्यास अधिक कालावधी | लागत असल्याने बेडची मोठी | अडचण आहे .
0 Comments