पंढरपूर , ता . २१ : पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना शहरातील सर्व कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल हाऊसफुल झाली आहेत . रुग्णांना वेळेवर उपचार होऊ शकत नसल्याने मृतांची संख्या वाढू लागली आहे .
कोणत्याच कोव्हिड डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याने रुग्णाला उपचार मिळत नसल्याने अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे . पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात पोटनिवडणूकीच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हजारो लोकांच्या गर्दीत सभा घेतल्या . त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे . दोन्ही तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत . गेल्या पंधरा दिवसात दोन्ही तालुक्यात मिळून दोन हजार ८१३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे . दिवसेंदिवस रूणांची संख्या वाढत असताना कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलची संख्या मात्र अत्यंत अपुरी पडत आहे . अनेक दिवस उपजिल्हा रुग्णालय , लाईफलाईन , गॅलेक्सी , अपक्स आणि श्री विठ्ठल अशा पाच ठिकाणी आणि तालुक्यातील करकंब येथे एक अशा एकूण सहा ठिकाणीच कोरोना रुग्णांवर उपचार होत होते . नुकतेच पावले , मेडिसिटी आणि वरदविनायक अशा तीन हॉस्पिटलना जिल्हाधिकारी यांनी कोरोनारुग्णांवर उपचार करण्यास मान्यता दिली आहे . त्यामुळे ७५ जादा बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत . पोलिस संकुलात प्राधान्याने पोलिसांवर उपचार करण्यासाठी ४८. ऑक्सिजन बेडची व्यवस्था असलेले हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे . परंतु , कोरोना रुग्णांच्याबावत्या संख्येच्या मानाने बेडची संख्या अत्यंत कमी पडू लागली आहे . सद्यस्थितीत सुमारे साडेपाचशेहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत . शहरातील सर्व हॉस्पिटलमधील क्षमता संपली असून हॉस्पिटल हाकस फुल झाली आहेत . शहर व तालुक्यातील गंभीर स्थिती लक्षात घेऊन उप जिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत . शहरातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून व्हेटिलेटर कमी पडू लागले आहेत . रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने गरजू रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाल्याचे पहायला मिळत आहे . शहरात कोरोना रुग्णांवर उपचार व्हावेत यासाठी संबंधितांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरु आहे . प्रत्येक हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यानंतर तिथे बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे . घरातील कोरोना बाधीत व्यक्तीवर उपचार व्हावेत यासाठी धावपळ करुन देखील दवाखान्यात दाखल करु न शकल्याने संबंधित रुग्णांचे उपचारा अभावी मृत्यू होऊ लागले आहेत . एकंदरीतच अतिशय विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे .
0 Comments