Breaking News

छगन भुजबळ यांनी केंद्राकडे केली होती मागणी ; ८० कोटी नागरिकांना होणार लाभ जूनपर्यंत केंद्र शासनाकडून मोफत अन्नधान्य

छगन भुजबळ यांनी केंद्राकडे केली होती मागणी ; ८० कोटी नागरिकांना होणार लाभ जूनपर्यंत केंद्र शासनाकडून मोफत अन्नधान्य


देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकार ने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे देशातील ८० कोटी नागरिकांना लाभ मिळणार आहे. ही योजना सुरू ठेवण्याची मागणी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान याना पत्र लिहून मागणी केली होती.पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना मे आणि जून २०२१ पर्यंत मोफत अन्नधान्याचा पुरवठा  करण्यात येणार आहे. गरीब लाभार्थी नागरिकांना ५ किलो गहूू, तांदूळ व १ किलो चणे देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकार २६००० कोटींहून अधिक रुपये खर्च करणार आहे

Post a Comment

0 Comments