google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

Breaking News

विज्ञान महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

 विज्ञान महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र 

              विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ साहेबराव जुदळे नियोजित समितीचे चेअरमन प्रा दीपक रिटे ज्येष्ठ प्रा बाबासाहेब इंगोले दत्तात्रेय भजनावळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले अभिवादन


          प्राचार्य डॉ साहेबराव जुंदळे आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की ावकुसाबाहेर जीवन जगणार्‍या माणसाला माणुसकीचे हक्क देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक होय आज भारतीय घटनेनुसार संपूर्ण देशाची व्यवस्था चालत आहे यामुळेच आज सर्वांना समानतेने जीवन जगता येत आहे व समानतेचा न्याय मिळत आहे आज आपण ज्या विचाराने जगत आहे त्याचे मूळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आहे महात्मा फुले यांनी समानतेचा विचार मांडला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार सर्वसामान्य पर्यंत व रुजवण्याचे मोठे कार्य केले म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महान विचारवंत आहेत आज विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आत्मसात करून जगले पाहिजे म्हणून त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन

             प्रा दीपक रिटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समानतेचे स्वातंत्र्याची वागणूक दिली व   भारतीय राज्यघटनेमध्ये त्याला लिखित रूप देऊन विषमतावादी समाजव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले आज आपण बाबासाहेबांच्या विचारामुळे स्वतंत्रपणे जगत आहोत व इतरांनाही जगवत आहे तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही विचार व्यक्त करण्याची जयंती आहे

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा दीपक रिटे यांनी केले तर आभार प्रा आबासाहेब इंगवले यांनी मानले कारे कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दत्तात्रेय भजनावळे सौ विमल ताई माने बापू जाधव इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला

Post a Comment

0 Comments