google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोले शहरातील सर्व नागरिकांना कडक नियमावलीत काय चालु काय बंद..

Breaking News

सांगोले शहरातील सर्व नागरिकांना कडक नियमावलीत काय चालु काय बंद..

 सांगोले शहरातील सर्व नागरिकांना  कळविण्यात येते कि , कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने दिनांक 13 एप्रिल २०२१ रोजी नवीन नियमावली जारी केलेली असून सदर नियम दिनांक 14 एप्रिल २०२१ चे रात्री ०८.०० पासून 1 मे २०२१ चे सकाळी 7.00 वा . पर्यंत लागू राहतील


. १. संपूर्ण शहरात दिनांक 14 एप्रिल २०२१ रात्री 8 वाजलेपासून 1 मे सकाळी 7.00 पर्यंत संपूर्ण संचारबंदी असेल . २. किराणा , बेकरी , मिठाई , भाजीपाला - फळांची दुकाने , दुध डेअरी , माल वाहतुक , पेट्रोलपंप , पशुवैद्यकीय सेवा / संगोपन केंद्र , पाळीव प्राणी खाद्य दुकाने , शीतगृहे व वखार सेवा , इलेक्ट्रिक व गॅस पुरवठा सेवा व सर्व प्रकारची खाद्य पदार्थांची दुकाने सुरु राहतील . अत्यावश्यक सेवेतील दुकानांत काम करणाऱ्या सर्वांनी कोरोना विषयक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक राहील . ३. सर्व दुकाने , मार्केट व मॉल्स ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा दिली जात नाही ते 1 मे 2021 पर्यंत बंद राहतील . ४. रस्त्यांवरील खाद्यविक्रेते यांना फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत सर्व दिवशी सुरु राहतील . ५. शेतीपुरक व्यवसाय व शेतीविषयक इतर सर्व कामे सूरच्छेवता येतील . ६. सर्व वकीलांची कार्यालये , मायक्रो फायनान्स संस्था , नॉन बँकींग वित्तीय महामंडळे , इन्श्युरन्स / मेडिक्लेम कंपन्यांची कार्यालये , खाजगी बँका तसंच ई - कॉमर्स सेवा अत्यावश्यक सेवा देणेसाठीच चालू राहतील . ७. हॉटेलच्या आतील आवारामध्ये वास्तव्यास असलेल्या प्रवाशांसाठीचे रेस्टॉरंट आणि बार वगळता सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील . तथापि , हॉटेल मध्ये फक्त होम डिलीव्हरी आणि पार्सल सेवा सकाळी 07.00 ते रात्री 8.00 पर्यंत चालू राहतील . ८. वृत्तपत्रे छपाई व वितरण सुरु राहील . ९ . शहरातील सर्व हेअर कटिंग सलून , स्पा , ब्युटीपार्लर हे बंद राहतील . १०.सर्व प्रकारचे धार्मिक , सामाजिक , राजकीय , सांस्कृतिक कार्यक्रम यांचेवर बंदी असेल . ११.अत्यावश्यक सेवा व वित्तीय संस्था वगळून उर्वरित सर्व खाजगी अस्थापना बंद राहतील . १२.शासकीय कार्यालयात शासकीय कर्मचारी वगळून इतर नागरिकांना प्रवेश नसेल . १३.सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे हे संबंधित भक्तांसाठी बंद राहतील . तथापि सदर प्रार्थनास्थळात सेवा करणारे पुजारी इत्यादींना दैनंदिन धार्मिक विधी करता येतील . १४.सर्व प्रकारचे खाजगी शिकवणी वर्ग ( कोचींग क्लास ) बंद राहतील . १५.ज्या ठिकाणी बांधकामाच्या ठिकाणीच कामगार राहत आहेत अशा बांधकामांना परवानगी देण्यात येत आहे . बाहेर बांधकाम साहित्य आणण्याच्या व्यतिरिक्त बांधकामाच्या ठिक कामगारांना आणने आणि नेणे टाळण्यात यावे . १६.सार्वजनिक उद्याने , मैदाने , सिनेमा हॉल , नाटयगृहे , सभागृहे , वॉटर पार्क , मनोरंजन पार्क , क्रीडा संकुले , जलतरण तलाव , क्लब , व्यायामशाळा , व्हिडीओ गेम पार्लर , चित्रीकरण पुर्णपणे बंद राहतील . १७.विवाह कार्यक्रमात जास्तीत जास्त 25 व्यक्तींना परवानगी असेल तसेच अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तींना परवानगी असेल .१८.सर्व नागरिकांनी मास्क , सुरक्षित अंतरांचे पालन करणे बंधनकारक आहे . अन्यथा निश्चित केल्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल . तसेच संबंधित आस्थापना तात्काळ बंद करणेत येतील , १ ९.अत्यावश्यक सेवा देणा - या आस्थापनामधील कर्मचारी व येणारे गि - हाईक यांनी कोरोना विषयक सुचनांचे पालन न केल्यास प्रति व्यक्ती 500 रू . दंड व संबंधित आस्थापनेला 1000 रु . दंड आकारण्यात येईल . २०.रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास ग्राहक आणि विक्रेता यांना प्रत्येकी 500 रू.दंड आकारण्यात येईल . २१.हॉटेल , रेस्टॉरंट तसेच विवाहस्थळी कार्यक्रमामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास प्रति व्यक्तीस 1000 रु तर संबंधित आस्थापनेस 10,000 रु दंड आकारण्यात येईल . २२.खाजगी वाहतूक ही फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच चालू राहतील . नियमांचे उल्लंघन केल्यास 1000 रु दंड आकारण्यात येईल . २३.सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना व चार चाकी वाहनाचा वापर करताना मास्क न वापरल्यास प्रत्येकी 500 रु . दंड आकारण्यात येईल .

Post a Comment

0 Comments