google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नियमांचे पालन न केल्यास दुकाने सील करून गुन्हे दाखल करणार पोलीस निरीक्षक श्री भगवान निंबाळकर साहेब

Breaking News

नियमांचे पालन न केल्यास दुकाने सील करून गुन्हे दाखल करणार पोलीस निरीक्षक श्री भगवान निंबाळकर साहेब

 सांगोला / प्रतिनिधी राज्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना निबंधांमुळे ४८ तासात दुकान उघडण्याची परवानगी द्यावी , अन्यथा आम्ही दुकाने उघडू असा इशारा व्यापारी महासंघाने निवेदनाद्वारे दिला होता . या पार्श्वभूमीवर नियमबाह्य शहरातील दुकाने उघडल्यास व शासनाच्या नियमांचे पालन न केल्यास संबंधित दुकाने सील करून गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल , असा इशारा पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे .


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगरपालिकेने शहरातील सेवा वगळता इतर सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत . या आदेशाविरोधात सांगोला व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे . यामध्ये व्यापाऱ्यांवरील निर्बंध हे अन्यायकारक आहेत . ४८ तासांत दुकाने उघडण्याची परवानगी न दिल्यास सर्व व्यापारी मिळुन आपापली दुकाने उघडतील . तसेच या शासनाच्या निर्णया विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे . यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून दुकाने उघडल्यास शासनाच्या नियमांचे उल्लंघन होणार आहे .

Post a Comment

0 Comments