google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला नगरपरिषदेकडून शहरातील सर्व दुकानदारांसह कामगारांना ३१ मार्चपर्यंत कोविड -१ ९ टेस्ट करणे बंधनकारक केले आहे .

Breaking News

सांगोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला नगरपरिषदेकडून शहरातील सर्व दुकानदारांसह कामगारांना ३१ मार्चपर्यंत कोविड -१ ९ टेस्ट करणे बंधनकारक केले आहे .

 सांगोला  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला नगरपरिषदेकडून शहरातील सर्व दुकानदारांसह कामगारांना ३१ मार्चपर्यंत कोविड -१ ९ टेस्ट करणे बंधनकारक केले आहे . ज्या व्यापाऱ्यांकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल त्यालाच दुकान उघडण्याची परवानगी राहणार आहे . चाचणी न करता व्यवसाय करणाऱ्या दुकानांवर कारवाई करून दुकान ३० दिवसांकरिता सील करण्याचा इशारा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिला आहे .


कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत . शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगोला नगरपरिषदेकडून कठोर पाऊल उचलून शहरातील सर्व खासगी आस्थापनाधारकांसह कर्मचाऱ्यांची २७ते ३१ मार्च या कालावधीत कोरोना | चाचणी करून घ्यावी . ज्यांच्याकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल त्यालाच दुकान उघडण्याची परवानगी राहणार आहे . नगरपालिका , तहसील कार्यालयव पोलीस स्टेशन यांच्या पथकामार्फत दुकानांची तपासणी केली जाणार आहे.ज्या दुकानदारांकडे कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र नसेल अशा दुकानदारांवर कारवाई करून दुकान 30 दिवस सील केले जाईल , असे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments