google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र बँकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या आडमुठे पणामुळे सांगोला शहरातील बँकेसमोर सोशल डिस्टंसिंग चा फज्जा

Breaking News

महाराष्ट्र बँकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या आडमुठे पणामुळे सांगोला शहरातील बँकेसमोर सोशल डिस्टंसिंग चा फज्जा

 महाराष्ट्र बँकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या आडमुठे पणामुळे सांगोला शहरातील बँकेसमोर सोशल डिस्टंसिंग चा फज्जा


 विशेष/ प्रतिनिधी ( अशोक भोसले)  ; सांगोला शहरातील महाराष्ट्र बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गलथान नियोजनामुळे बँकेत येणाऱ्या खातेदारांनी बँकेसमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसंदिवस झपाट्याने वाढत आहे. प्रशासकीय पातळीवरुन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या कोणत्याही नियम, अटी व सूचनांचे पालन या बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या यांचेकडून होताना दिसत नाही. कामानिमित्त बँकेत आलेल्या फक्त पाचच खातेदारांना बँकेत प्रवेश दिला जातो. त्यामुळे बँकेसमोर मोठी गर्दी होत आहे. बँकेत छोट्या-मोठ्या कामासाठी गेलेल्या खातेदाराचे वेळेत काम पूर्ण होत नसल्याने त्यांना तासंतास बँकेसमोर ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे सांगोला शहरातील महाराष्ट्र बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आडमुठे पणामुळे या बँकेतील खातेदारांना कोरोना संकट काळात हि मनस्ताप सहन करावा लागत आहे .याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगोला शाखेतील बँक कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची गरज असल्याचे मत या बँकेतील काही खातेदारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले

Post a Comment

0 Comments