google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महिलांनो! घरकाम करणाऱ्या महिलेने मारला मालकाच्या दागिन्यांवर डल्ला; सोलापूर जिल्ह्यात घटना

Breaking News

महिलांनो! घरकाम करणाऱ्या महिलेने मारला मालकाच्या दागिन्यांवर डल्ला; सोलापूर जिल्ह्यात घटना

 महिलांनो! घरकाम करणाऱ्या महिलेने मारला मालकाच्या दागिन्यांवर डल्ला; सोलापूर जिल्ह्यात घटना घरकाम करणाऱ्या महिलेनेच घरातील दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पंढरपूर शहर पोलिसांनी ही घटना उघडकीस आणली.याबाबत सविस्तर वृत्त असे की,पंढरपूर शहरानजीक असणाऱ्या इसबावी येथील गुलाब दिगंबर पोरे यांच्या घरी गेल्या महिन्यात चोरी झाली २२ फेब्रुवारी २०२१ रोजी पोरे कुटुंब आपल्या मुलीच्या लग्नासाठी कोल्हापूर येथे गेले होते.


लग्न आटोपून घरी आल्यानंतर घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कुलूप उघडून घरात जाताच मागील बाजूचा दरवाजा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.घरात पडलेले अस्ताव्यस्त सामान पाहून चोरी झाल्याची त्यांना खात्री पटली.पोरे यांच्या पत्नी संगीता हिने लाकडी कपाट उघडून पाहिले, यावेळी सुमारे २ लाख १४ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.या घटनेची ५ मार्च रोजी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. गुलाब पोरे यांच्या घरी झालेल्या चोरीची पद्धत पाहता ही चोरी या घरात वावरणाऱ्या व्यक्तीनेच केली असल्याचा संशय पोलिसांना आला आणि तपासाची चक्रे फिरू लागली.या घरात घरकाम करणाऱ्या महिलेने ही चोरी केली असावी असा संशय व्यक्त करून तपास सुरू झाला. या महिलेवर पोलिसांनी बारीक नजर ठेवली.या काळात तिचे वर्तन काहीसे वेगळे भासल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतले विश्वासात घेऊन विचारले असता तिने चोरी केल्याचे कबूल केले आणि चोरीचे दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले.पंढरपूर शहरात तसेच उपनगरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना पोलिसांनी या चोरीची उकल केली . यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments