google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वेश्या व्यवसाय अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोन लाखाचा मुद्देमाल केला जप्त दोघांना अटक,पाच दिवसाची पोलिस कोठडी

Breaking News

वेश्या व्यवसाय अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोन लाखाचा मुद्देमाल केला जप्त दोघांना अटक,पाच दिवसाची पोलिस कोठडी

 वेश्या व्यवसाय अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून दोन लाखाचा मुद्देमाल केला जप्त दोघांना अटक,पाच दिवसाची पोलिस  कोठडी श्री संत दामाजी साखर कारखाना परिसरात पत्र्याच्या घरात चालणार्‍या वेश्या व्यवसाय अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त


करून दोघाविरूध्द अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून एक महिला व एक पुरुष या दोघांना अटक करून न्यायालयात उभे केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.दरम्यान मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून संपूर्ण राज्यात ओळखली जात असताना या वेश्या व्यवसायामुळे नागरिकांमधून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,साखर कारखाना परिसरात वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिस प्रशासनास मिळताच दि.25 रोजी 11.57 वाजता डमी गिर्‍हाईक पाठवून खातरजमा करून पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात रोख रक्कम, मोबाईल असा 2 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यातील महिला आरोपी ही मंगळवेढा शहरातील साठे नगर व हल्ली उचेठाण येथे राहणारी असून तीने यातील अन्य दोन महिलेस सांगली व औरंगाबाद येथून उचेठाण येथे आणून दामाजी साखर कारखाना चौकाच्या पूर्व बाजूस असणार्‍या पत्र्याच्या घरात कुंटणखान्याप्रमाणे तयार करून वरील दोन महिलांना वेश्या व्यवसायाकरीता प्रवृत्त करून तसेच पैशाचे अमिष दाखवून व्यवसाय करण्यास भाग पाडले. पोलिसांच्या छाप्यावेळी पंढरपूर येथून आलेले गिर्‍हाईक व पोलिसांनी पाठविलेले डमी गिर्‍हाईकाकडून एक हजार रुपये घेवून त्यातील 250 रुपये सदर देह विक्री करणार्‍या महिलेस देवून बाकीचे 750 रुपये स्वतःच्या फायदयाकरीता ठेवून घेतले. दरम्यान सदर महिलेची शारिरिक पिळवणूक करून त्यांचेकडून वेश्या व्यवसाय करून घेवून त्यांचे कमाईवर स्वतःची उपजिविका करताना मिळून आल्याचे पोलिस उपनिरिक्षक प्रणोती यादव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.तपासिक अंमलदार पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दोघा आरोपीना कोर्टात उभा केल्यानंतर दि. 30 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.राज्यामध्ये मंगळवेढयाची संतांची भूमी अशी ओळख आहे. या भूमीत 17 संत होवून गेल्याने या भूमीला पवित्र भूमी म्हणून ओळखले जात असताना या भूमीत गेली अनेक महिने वेश्या व्यवसाय सुरु असल्याने भाविक भक्तांमधून संताप व्यक्त होत आहे.सदर घटनेचे ठिकाण हे मंगळवेढा शहर हद्दीत येत आहे.

Post a Comment

0 Comments