सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांचे कडील संदर्भ क्रमांक जा. क्र. 20 21/ डीसीबी/ 02 /आर आर/1246 दिनांक 25/03/2021 अन्वये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे बाबतचा आदेश झालेला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्र दिनांक 14 मार्च 20201 अन्वये कोरोना विषाणू (covid-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1997 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात covid-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्ती विरूद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.मागील काही दिवसात covid-19 विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढ होत आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातही रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास प्रतिबंध करणेसाठी खालील प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
1) सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 07.00 वा ते रात्री 07.00 वा या कालावधीत चालू राहतील. तथापि हे निर्बंध आवश्यक सेवा/मनुष्य व प्राणी मात्रा साठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा, दूध व वृत्तपत्रे वितरण या बाबींना लागू राहणार नाही.
2) प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तथापि हे निर्बंध अत्यावश्यक सेवा/ मनुष्य व प्राणी मात्र साठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, किराणा, दूध व वृत्तपत्रे वितरण या बाबींना लागू राहणार नाही.
3) सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार, जनावरांचा बाजार बंद करण्यात येत आहे.
4) खाद्यगृह, परमिट रूम, बार फक्त सकाळी 07.00 ते रात्री 08.00 या कालावधीत covid-19 चे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून 50% क्षमतेने सुरू राहतील. होम डिलिव्हरी चे किचन /वितरण कक्ष रात्री 10.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
5)जीम, व्यायाम शाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव वैयक्तिक सरावासाठी सुरू राहतील. अन्यथा इतर करण्यासाठी उपरोक्त सेवा बंद राहतील. तसेच स्पर्धा/कार्यक्रम बंद राहील.
6) सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 07.00 ते संध्याकाळी 07.00 या वेळेत सुरु राहतील. धार्मिक विधींमध्ये 05 व्यक्तींपेक्षा जास्त उपस्थिती राहणार नाही.
7) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने नियोजन करून एका दिवशी व एकाच वेळी लिलाव न करता मालाच्या प्रकारानुसार लिलावाचे दिवस व वेळा विभागून द्यावेत व त्याचे नियोजन संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर यांनी करावे.तसेच बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालाची त्या ठिकाणी किरकोळ विक्री करण्यास प्रतिबंध असेल.
8) प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये (कंटेनमेंट झोन) सर्व प्रकारची दुकाने, अस्थापना, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, कार्यालय बंद ठेवण्यात यावीत, तथापि या ठिकाणी अत्यावश्यक सेवेची अस्थापना विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार चालू ठेवण्यात यावीत.
9) सर्व संबंधित विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरू करून जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करून नागरिकांमध्ये covid-19 बाबतचे मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बाबत जनजागृती करावी.
10) तसेच covid-19 बाबतीत शासनाच्या मार्गदर्शक सूचना जसे मास्क वापरणे सुरक्षित अंतर राखणे ह्यांचा आणि टायगर चा वापर इत्यादी बंधनकारक राहील.सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अस्थापना तसेच सर्व नागरिकांनी उपरोक्त नमूद केलेल्या सर्व उपाययोजना त्याचप्रमाणे शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी.सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्यावर भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे आणि विनियम या नुसार कारवाई करण्यात येईल
श्री भगवान निंबाळकर पोलीस निरीक्षक,
सांगोला पोलीस ठाणे
0 Comments