google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पैसे भरलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तात्काळ जोडावे : आ.शहाजीबापू पाटील

Breaking News

पैसे भरलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तात्काळ जोडावे : आ.शहाजीबापू पाटील

 सांगोला / प्रतिनिधी : गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज बिल थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडणीचे सत्र महावितरणकडून चालू होते यामुळे हातातोंडाला आलेली पिके अडचणीत सापडली होती


या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी प्रतिनिधी सह महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री गवळी व इतर अधिकारी यांच्या समवेत दिनांक १७ मार्च २०२१ रोजी पंढरपूर येथे बैठक घेऊन या बैठकीमध्ये वीजबिले टप्प्या टप्प्याने भरण्यात यावीत असा यशस्वी तोडगा काढला . शेतकऱ्यांनी महावितरणकडे एक अश्वशक्ती साठी एक हजार रुपये प्रमाणे भरावेत असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश शेतकऱ्यांनी ७० % ते ८० %

रक्कम बैठकीच्या तोडग्याप्रमाणे भरणा केलेली आहे परंतु वीज तोडणी केलेले काही ट्रान्स्फॉर्मर अद्याप सुरु न केल्याने शेतकऱ्यांचे अगोदरच पुराचा तडाखा कोरोना महामारी , शेतीमालाचे गडगडलेले दर , अवकाळी पाऊस अतिवृष्टी , यामुळे कंबरडे मोडले आहे अशा अडचणीतून शेतक - यांनी जुळवाजुळव करून वीजबिलाचा भरणा केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न पाहता वीज कनेक्शन तातडीने जोडून पूर्ववत करण्यात यावीत अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांना दिल्या ज्या शेकऱ्यांनी पैसे भरले आहेत परंतु त्यांची वीज जोडणी झालेली नाही अश्या शेतकऱ्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments