शिक्षकांच्या उपस्थितीतीची ठरली वेळ ! सकाळी आठ ते दुपारी 12 पर्यंतच शाळेत येण्याचे आदेश
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार..जिल्ह्यातील संपूर्ण शाळा (दहावी-बारावी वगळून) 14 मार्चपर्यंत बंदच राहतील मुख्याध्यापकांनी पुढील आदेश येईपर्यंत शाळा सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये शाळा बंद असल्या तरीही शिक्षकांची शाळेतील उपस्थिती अनिवार्य आहे सकाळी आठ ते दुपारी 12 वाजेपर्यंतच शिक्षकांची शाळेत उपस्थिती बंधनकारक शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदेशाचे पालन करणे संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी अनिवार्य सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी घेत राज्य सरकारने 14 मार्चपर्यंत शाळा व महाविद्यालये बंदचा निर्णय घेतला. मात्र, एप्रिल-मे महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा असल्याने या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, दहावी-बारावी वगळता अन्य शाळा बंद असल्या, तरीही शिक्षकांनी सकाळी आठ ते दुपारी 12 या वेळेत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार...जिल्ह्यातील संपूर्ण शाळा (दहावी-बारावी वगळून) 14 मार्चपर्यंत बंदच राहतील मुख्याध्यापकांनी पुढील आदेश येईपर्यंत शाळा सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये शाळा बंद असल्या तरीही शिक्षकांची शाळेतील उपस्थिती अनिवार्य आहे सकाळी आठ ते दुपारी 12 वाजेपर्यंतच शिक्षकांची शाळेत उपस्थिती बंधनकारक शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदेशाचे पालन करणे संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी अनिवार्य सोलापूर शहर-जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक व शिक्षकांना कोरोनासंबंधीचे नियम पालन करण्यासंदर्भातही प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर आणि महापालिकेचे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी आवाहन केले आहे. दरम्यान, शाळेतील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत काढलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे मुख्याध्यापकांना बंधनकारक आहे. ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त शिक्षकांना विनाकारण शाळेत थांबवून घेऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे सकाळी आठ ते दुपारी 12 या वेळेत शिक्षकांनी शाळेतूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करावे, असे आदेशही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तुर्तास 14 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील निर्णयापर्यंत शहर-जिल्ह्यातील कोणत्याही शाळा (दहावी-बारावी वगळता) सुरु होणार नाहीत, याची दक्षता संबंधित शाळांमधील मुख्याध्यापकांनी घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय पुन्हा झाल्यास, उन्हामुळे सकाळच्या सत्रात शाळा भरविण्यासंदर्भातही आदेश काढले जाणार आहेत.


0 Comments