सांगोला : - आजच्या काळात पैशाची वचत करावी असे प्रत्येकाला वाटत असते . मात्र पैशाची बचत करणे प्रत्येकालाच सहज शक्य होत नाही . बाजारात सुद्धा पैशाची वचत करण्यासंबंधी अनेक स्कीम असतात , मात्र आज आम्ही तुम्हाला पोस्टाची एक जवरदस्त स्कीम सांगणार आहोत .
या स्कीमच्या माध्यमातून दररोज एक निश्चित रक्कम सेव्ह केल्यानंतर तुम्ही काही वर्षातच लखपती बनाल . यासाठी तुम्हाला फार मोठी रक्कम सेव्ह करण्याची गरज नाही . तुम्हाला दररोज फक्त दोनशे रुपयांची वचत करायची आहे . काही वर्षातच जमा होईल २१ लाखांचा फंड दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या वचतीची सवय तुम्हाला भविष्यातील एक मोठी जमापुंजी जमा करण्यासाठी मदत करत असते . हाच वचतीचा मार्ग तुम्हाला इथे अवलंबायचा आहे . रोजच्या खर्चातून फक्त दोनशे रुपये तुम्हाला सेव्ह करायचे आहेत . आज केलेली ही वचत येत्या काही वर्षात तुम्हाला लखपती बनवू शकते आणि या वचतीच्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वप्न सहजरित्या पूर्ण करू शकता . पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोविडेंट फंड अकाउंट म्हणजेच पीपीएफ हा सद्यस्थितीचा वचतीचा एक उत्तम पर्याय आहे . तुम्हाला तुमच्या या अकाउंटमध्ये रोज दोनशे रुपयांची वचत करायची आहे . जर तुम्ही रोज हे करू शकला , तर स्किम संपेपर्यंत तुमच्याअकाउंटमध्ये २१ लाखांचा फंड जमा झालेला असेल . कोणत्याही शाखेत हे अकाउंट ओपन करू शकता : - पोस्ट आफिसच्या देशभरातील कोणत्याही शाखेत तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता . एवढेच नाही तर तुम्ही एकापेक्षा अधिक अकाउंट सुद्धा ओपन करू शकता . याशिवाय दोन व्यक्ती मिळून सुद्धा हे अकाउं तुम्ही ऑपरेट करू शकता.असे मिळतील २१ लाख रुपये : - समजा तुमचे सध्याचे वय २५ वर्षे आहे आणि तुम्ही आजपासून आपल्या दैनंदिन जीवनातील रकमेतील दोनशे रुपये रुपयांची बचत करत आहात . ही अशी बचत तुम्हाला पंधरा वर्ष करायची आहे . पंधरा वर्षानंतर तुम्हाला २१ लाखांचा मोबदला मिळणार आहे.कसा तयार होईल फंड या स्कीमच्या माध्यमातून जर तुम्ही दररोज २०० रुपयांची बचत करू इच्छिता तर याप्रमाणे महिन्याचे सहा हजार रुपये होतात , म्हणजेच एका वर्षाचे झाले ७२ हजार रुपये . जर तुम्ही अशा पद्धतीने लागोपाठ पंधरा वर्षे वचत केलीत तर १५ व्या वर्षापर्यंत तुम्ही वचत केलेली रक्कम १० लाख ८० हजार रुपये इतकी असेल . तुम्ही जमा केलेली रक्कम ही पीपीएफ अकाउंट मध्ये असल्यामुळे त्या रकमेवर वार्षिक ८ टक्क्यांनी तुम्हाला व्याज मिळेल . ही व्याजाचीरक्कम तुम्ही जमा केलेल्या रकमेत समाविष्ट केली जाईल.याच पद्धतीने पंधरा वर्ष त्या रकमेवर व्याज मिळाल्यानंतर तुम्हाला पंधरा वर्षानंतर मिळणारी एकूण रक्कम २१ लाख रुपये असेल . याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्ही केलेल्या वचतीवर तुम्हाला तब्बल १० लाख ३१ हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे . थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्हाला १० लाख ३१ हजारांचा अतिरिक्त फायदा होणार आहे.शंभर रुपये भरून हे अकाउंट ओपन करू शकता : आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला हे अकाउंट ओपन करायचे असेल तर यासाठी फक्त तुम्हाला शंभर रुपये भरावे लागतील . कारण पोस्ट ऑफिसमध्ये हे अकाउंट ओपन करण्याची फी फक्त शंभर रुपये आहे . असे असले तरी या अकाउंटमध्ये वर्षभरात कमीत कमी पाचशे रुपये सेव्ह करणे अनिवार्य आहे . याशिवाय एका वर्षात तुम्ही जास्तीत जास्त दीड लाखापर्यंतची रक्कम सेव्ह करू शकता . हे अकाउंट तुम्ही जॉइंट अकाउंट म्हणून देखील ओपन करू शकता . तसेच आपल्या मुलांच्या नावानेसुद्धा तुम्ही अकाउंट ओपन करू शकता . मात्र सध्या यामध्ये प्रीमॅच्युअर विड्रॉलची सुविधा उपलब्ध नाही.काय मग कशी वाटली पोस्टाची ही भन्नाट स्कीम . आपल्या नातेवाईकांना तसेच मित्र मैत्रिणींना सुध्दा याची माहिती द्यायला विसरू नका .


0 Comments