सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी भगवान निंबाळकर यांची नियुक्ती
सांगोला / प्रतिनिधीअकलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची बदली सांगोला पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांचे मुळगाव बेलवंडी , ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर , त्यांनी नोकरीची सुरवात पोलीस उपनिरीक्षक या पदापासून केलेली असून ,त्याच्या नोकरीची सुरुवात नागपूर येथून झाली आहे .
नागपूर येथे त्यांनी सात वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांनी ठाणे येथे सात वर्ष काम केले , मुंबई येथे पाच वर्ष सीआयडी क्राईम ब्रांच मुंबई येथे दोन वर्षे , तर पुणे ग्रामीणला चार वर्षे काम केले . शिरूर येथे दोन वर्ष , तर दौंड येथे दोन वर्ष आणि अक्कलकोट येथे ही ते कार्यरत होते . तेथून त्यांची अकलूज पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली होती .
पोलीस भगवान निंबाळकर हे दौंड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना तेथील ४९ गुंडांना दोन वर्षासाठी पुणे व नगर जिल्ह्यातून तडीपार केलेले होते . त्यांनी जागोजागी तडीपार गुंडांचे फोटो लावून बॅनर लावलेले होते . सदर गुंडव्यक्ती आपणास आढळून आल्यास त्वरित पोलिस स्टेशनचे संपर्क साधावा असे आवाहन केल्याने तडीपार गुंड त्या हद्दीमध्ये फिरकले सुद्धा नाहीत .
अकलूज पोलिस स्टेशनचा पदभार घेतल्यानंतर या परिसरातील सर्व बारीक सारीक गोष्टींचा आढावा घेऊन काही गैर आढळून आल्यास गुन्हेगारी वृत्त करणाऱ्यास थारा दिला नाही.त्यामुळे सांगोल्याला एक शिस्तबद्ध ,खमक्या पोलीस निरीक्षक लाभल्याने सांगोलकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे


0 Comments