धक्कादायक! कर्जाचा हप्ता मागायला गेलेल्या सोलापूरच्या तरुणाचा कर्जदाराने केला खून उरुळी कांचन येथे खाजगी फायनान्स कंपनीच्या वैयक्तिक कर्ज विभाग प्रमुखावर कर्जदाराने कोयत्याच्या साहाय्याने मानेवरती वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना उरुळी कांचन-जेजुरी रस्त्यावरील सौरभ कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात घडली. रवींद्र प्रकाश वळकुंडे (वय २३, मुळ रा.अकलूज, जि. सोलापूर, सध्या रा.नक्षत्र सोसायटी,उरुळी कांचन) असे खून झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, उरळीकांचन परिसरातील एका इमारतीत बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. आरोपी राहुल गाढवे याने बजाज फायनान्समधून पर्सनल लोन घेतले होते.या खर्चाचे हप्ते त्वरित भरावेत यासाठी मयत रवींद्र वळकुंडे यांनी आरोपीकडे पाठपुरावा केला होता.याच कारणावरून आरोपीने मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कार्यालयात येऊन रवींद्र वळकुंडे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले.यामध्ये गंभीर जखमी झाल्याने वळकुंडे यांचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.(source: लोकमत )


0 Comments