google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आता ग्रामपंचायत सदस्य व त्याचे कुटुंबीयांचे अतिक्रमण चालणार नाही. ग्रामविकास मंत्रालयाचा व सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय.

Breaking News

आता ग्रामपंचायत सदस्य व त्याचे कुटुंबीयांचे अतिक्रमण चालणार नाही. ग्रामविकास मंत्रालयाचा व सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय.

 आता ग्रामपंचायत सदस्य व त्याचे कुटुंबीयांचे अतिक्रमण चालणार नाही. ग्रामविकास मंत्रालयाचा व सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय.


चंद्रपूर - (प्रतिनीधी) आता यापुढे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच व त्यांचे कुटूंबातील इतर सदस्य यांचं एक इंचसुद्धा अतिक्रमण असल्यास त्यांचेवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच पद रिक्त करण्याच्या सूचना ग्रामविकास विभाग व सर्वोच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यात बऱ्याच जिह्यात ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या आहेत त्यामध्ये निवडून आलेले सदस्य हे जबाबदार नागरिक असून त्यांचा जनतेने आदर्श घ्यावा ह्या हेतूने त्यांचे वर्तन व राहणीमान याच समाजमनावर प्रतिबिंब पडते हाच उद्देश समोर ठेऊन न्यायालयाने तात्काळ असा आदेश काढला की यापुढे कोणत्याही ग्रामपंचायत सदस्य व त्याचे कुटुंबातील भाऊ, वडील यांचे इंचभर सुद्धा अतिक्रमण असल्यास त्यांना तात्काळ पदावरून काढून टाकून त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. सदरच्या निर्णयामुळे जनतेत जरी आनंद असला तरी बऱ्याच ग्रामपंचायत सदस्य यांना डोकेदुखी ठरणार आहे, कारण बरेच सदस्य यांचे घर, खोल्या, घरासमोर असणारे ओटे, गावात इतरत्र असणारे अतिक्रमण तात्काळ काढावे लागणार आहे. काही सदस्यांची घरे मुख्य रस्त्यावर असून त्यांनी गावनकाशात असणाऱ्या रस्त्यावर बांधकाम केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे, अश्या सदस्यांनी मुख्य रस्ता सोडून असलेले अतिक्रमण, घरे, खोल्या, ओटे तात्काळ स्वखर्चाने पाडले नाहीत तर शासन त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करून पदावरून खारीज करणार आहे. तसेच ज्या सदस्यांनी उमेदवारी दाखल करतांना दिलेले संपत्ती चे विवरण, शौचालय, अतिक्रमण नसल्याचे हमीपत्र या सर्वांच्या प्रति जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात पाठवण्यात आल्या असून त्यावरही संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष ठेऊन असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments