google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अवैध वाळू चोरीला पायबंद घालण्यासाठी तहसीलदार यांनी तैनात केली भरारी पथके

Breaking News

अवैध वाळू चोरीला पायबंद घालण्यासाठी तहसीलदार यांनी तैनात केली भरारी पथके

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - विनापरवाना करणाऱ्या वाळू उपसा वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केल्यानंतर संबंधित व्यक्तींना दंड भरून वाहन सोडवून घेऊन जाण्यासाठी नोटीसा दिल्या होत्या


. मात्र पाच वर्षांनंतरही संबंधितांनी दंड भरण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने त्यांना नमुना १ व २ च्या नोटीसा देण्यात आल्या असून साडेती कोटी रुपयांचा दंड न भरणाऱ्या १८२ जणांच्या जंगम मालमत्तेवर ( सात बारा उताऱ्यावर ) बोजा चढवण्याची प्रक्रि सुरू असल्याची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली . दरम्यान , अवैध वाळू चोरीला पायबंद घालण्यासाठी तहसीलदार अभिजित पाटील यांनी दोन भरारी पथके तैनात केली आहेत . गेल्या पाच - सहा वर्षांपासून तालुक्यात माफियांनी दिव रात्र वाळू वाळू उपसा करण्याचा सपाटा लावला होता . मा कोरडा , अफ़्रका , बेलवण नदीलगतच्या शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत होता . दरम्यान २०१६ पासून महसूलच्या अधिकारी , कर्मचा - यांनी विनापरवाना वाळू उपसा करून वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करत सदरची वाहने जप्त केली आहेत . या कारवाईनंतर अनेकांनी दंड भरून वाहने सोडवून घेतली . मात्र अद्यापही १८२ जणांनी दंड भरण्याकडे दुर्लक्ष केले . विनापरवाना वाळू उपसा करणा - या १८२ जणांकडे अद्यापही दंडाची ३ कोटी ४० लाख ५२ हजार ४० ९ रुपये प्रलंबित आहेत . पाच वर्षांनंतरही दंड भरण्यासाठी संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी अॅक्शन मोडमध्ये येत महसूलचा दंड न भरणाऱ्या १८२ जणांच्या जंगम मालमत्तेवर बोजा चढवण्याचे आदेश दिले आहेत .

Post a Comment

0 Comments