google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस

Breaking News

सांगोला शहर व तालुक्यात अवकाळी पाऊस

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला तालुक्यात बुधवार दि .१७ रोजी रात्रीच्या सुमारास सरासरी ३ ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे तालुक्यात जास्त नुकसान झाले नसले तरी द्राक्ष उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .


या अगोदरचे अवकाळीने नुकसान झालेल्याची भरपाई मिळते न मिळते तोच पुन्हा अवकाळीचे काळे ढग शेतकऱ्यांच्या समोर उभे राहिले आहेत . यावर्षी सुरुवातीपासूनच अवकाळीचे संकट शेतकऱ्यांच्या समोर उभे ठाकले आहे . सध्या तालुक्यात गहू , ज्वारी , हरभरा आदी पिकांबरोबर डाळिंब , द्राक्ष बागांचा बहार धरला आहे . बुधवारी रात्री ९ नंतर अचानक अवकाशात विजांचा कडकडाट सुरु झाला.शहरात ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या . सांगोला मंडलमध्ये सर्वाधिक २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यात सरासरी ४.३३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे . या पावसामुळे तालुक्यात जास्त नुकसान झाले नसले तरी परिपक्व झालेल्या द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका वसु शकतो . हवामानाच्या अंदाजानुसार एक दोन दिवसात पुन्हा अवकाळी पाऊस पडेल की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे . काही ठिकाणी ज्वारी काढणीस झाली आहे तर अनेक ठिकाणी गव्हुही काढणीयोग्य झाला असल्याने यापुढेही पाऊस झाला तरी गहू , ज्वारीचेही नुकसान होणार आहे

Post a Comment

0 Comments