google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस कर्मचाऱ्याला२ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने पोलीस दलात खळबळ !

Breaking News

पोलीस कर्मचाऱ्याला२ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने पोलीस दलात खळबळ !

 २ लाखाची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडल्याने पोलीस दलात खळबळ !


तक्रारदार याच्यावर दाखल झालेल्या जुगाराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तब्बल २ लाखाची लाचेची मागणी करून सदरची २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर शहर पोलिस दलातील पोलिस कर्मचारी व एका खासगी इसमास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे . गणपतसिंग मोहनसिंग चव्हाण ३८ वर्षे , पो.ना. ३७३ नेमणूक सदर बझार पोलीस स्टेशन अंकित सदर बझार पोलीस चौकी सोलापूर शहर , व धीरजकुमार पांडुरंग शिवशरण ३४ वर्षे , असे लाच स्वीकारलेल्या दोघांची नावे आहेत .याबाबतची सविस्तर हकीकत अशी की , यातील तक्रारदार यांचे मित्रावर जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

त्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना आरोपी न करण्यासाठी आरोपी क्रमांक १ चव्हाण यांनी २ लाख रुपये लाच मागणी करून , खाजगी इसम आरोपी क्रमांक २ धीरजकुमार शिवशरण यांचे मार्फत २ लाख रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे . ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील , पोलीस उपनिरीक्षक जगदीश भोपळे , पोलीस निरीक्षक रशीद बाणेवाले , श्रीराम घुगे सनी वाघमारे यांनी केली आहे .तसेच सोलापूर जिल्ह्यात अश्या प्रकारे आपले पदीय काम करण्यासाठी कोणी लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांचेकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील , यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments