सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) येथील नगरपरिषेकडून वसुंधरेच्या संरक्षणाकरीता मुख्याधिकारी याच्या संकल्पनेतून वृक्ष बैंक स्थापनेचा राज्यातील पहिलाच अभिनव उपक्रम सुरु केला आहे .
सदर वृक्ष किची स्थापना राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्र यांनी दिली . गुरुवार जानेवारी रोजी नगराध्यक्षा राणी माने , पाणीपुरवठा सभापती शोभा घोंगडे , आरोग्य सभापती रफिक तांबोळी , मुख्याधिकारीकैलास केंद्र कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर पाणीपुरवठा अभियंता तुकाराम माने , आरोग्य निरीक्षक संजय दौडे यांच्या उपस्थितीमध्ये नगरपरिषद आवारात या वृक्ष बँकेच्या स्थापनेचा औपचारिक कार्यक्रम पार पडला . सांगोला शहरातील नागरिकांकडून माडांची रोपे स्विकारून नगरपरिषदेमार्फत शहरात विविध ठिकाणी त्यांची लागवड व जतन करून शहरास स्वच्छ , सुंदर व हरित बनविणे हा वृक्ष बँकेचा प्रमुख आहे . शहरातील शहरातील नागरिक , रोटरी क्लब , इनसहीबल क्लब , लायन्स क्लब व शहरातील इतर सर्व सामाजिक संस्था , विविध उत्सव मंडळे , राजकीय पक्ष , कार्यकर्ते यांनी पर्यावरणपुरक देशी वृक्षांची रोपे व सरंक्षण जाळ्या मोठया नगरपरिषदेतील या वृक्ष बैंकस देवून सहकार्य करायचे आहे . या वृक्ष केत प्राप्त होणाऱ्या | सर्व रोपांची शहरात उपलब्ध | होणान्या ठिकाणी लागवड करुन त्याचे नगरपरिषदेमार्फत संवर्धन | केले जाईल . वृक्ष कस रोपे भेट देणाऱ्या सर्व संस्था , नागरिक यांचे | रेकॉर्ड जतन करून रोपांच्या संरक्षणासाठी लावण्यात येणाऱ्या संरक्षण जार्जीवरती त्यांची नावे लावण्यात येतील . सांगोलाशहराचा विचार करता नवनवीन होणाऱ्या बांधकामामुळे विकास होत असताना पर्यावरणाची हानी न होता शावत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे . स्वच्छ हवा , नद्या , डोंगर , निसर्ग , पर्यावरण या सर्वांची भावी पिढीसाठी करण्यासाठी नगरपरिषदेमार्फत या वृक्ष केच्या अभिनय प्रयोगाची सुरुवात केल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली .


0 Comments