google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गांजासह सव्वादहा हजारांचा मुद्देमाल जप्त

Breaking News

गांजासह सव्वादहा हजारांचा मुद्देमाल जप्त

 सांगोला : शहरातील एका वर्कशॉपच्या शेजारी अज्ञात इसमाने कोणाला दिसू नये अशा ठिकाणी छापडीच्या बॉक्समध्ये सुमारे ९ ७५० रुपयांचा गांजा व ४८० रुपये किमतीचे काचेचे ग्लास असा सुमारे दहा हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला . याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र जाधव यांनी सदरचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .


पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या आदेशाने सपोनि प्रशांत हुले , पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र जाधव , पोलीस नाईक प्रमोद गवळी , पोलीस कॉन्स्टेबल राहुल देशमुख , सचिन देशमुख , बाबासाहेब पाटील , गणेश कुलकर्णी हे सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते .

सांगोला तेवाडेगाव रस्त्यावरील समर्थ पावडर कोटिंग आणि स्टील ट्रेडिंग कंपनीबाहेर खाकी रंगाचा छापडीचा बॉक्स संशयितरीत्या पडल्याची बातमी मिळाली . त्याआधारे सपोनि प्रशांत हुले यांनी तेथे छापा टाकून वर्कशॉप बाहेर पत्र्याच्या भिंतीलगत गवतामध्ये एक खाकी रंगाचा छापडीचा बॉक्स श्री समर्थ स्टील फॅब्रिकेशनचे रवींद्र कोरे आणि त्यांच्या बाजूला व्यवसाय करणारे त्यांचे | मेहुणे समर्थ स्टील अॅण्ड पावडर कोटिंगचे पंकज चौगुले यांच्याकडे त्या | बॉक्सबाबत विचारपूस केली . त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले . पोलिसांनी पंचासमक्ष सदर बॉक्स फोडून पाहणी केली . त्यामध्ये सुमारे नऊ हजार ७५० | रुपये किमतीचा ३ ९ ० ग्रॅम गांजा आणि ४८० रुपये किमतीचे काचेचे १२ ग्लास असा दहा हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

Post a Comment

0 Comments