google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जवळा - ग्रामपंचायत निवडणूकीत अचारसंहितेचा भंग करणाराची गय केली जाणार नाही असा इशारा सांगोला पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक कोकणे साहेब यांनी दिला

Breaking News

जवळा - ग्रामपंचायत निवडणूकीत अचारसंहितेचा भंग करणाराची गय केली जाणार नाही असा इशारा सांगोला पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक कोकणे साहेब यांनी दिला

 जवळा येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठक संपन्न जवळा - ग्रामपंचायत निवडणूकीत अचारसंहितेचा भंग करणाराची गय केली जाणार नाही असा इशारा सांगोला पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक कोकणे साहेब यांनी दिला .सांगोला तालुक्यातील मोठी असलेल्या जवळा पंचक्रोशितिल ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जवळा येथे बुधवार दि . ६ रोजी शांतता बैठकीचे आयोजन केले होते


. उपस्थित उमेदवार , ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पो.नि.कोकणे बोलत होते . यावेळी जवळा गावचे तंटामुक्त अध्यक्ष अरुण भाऊ घुले , भोपसेवाडी गावचे तंटामुक्त अध्यक्ष नरळे मेजर , ग्रामसेवक नवनाथ करे आदि.उपस्थित होते . पुढे बोलताना पो.नि.कोकणे म्हणाले रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरती प्रतिबंधात्मक कारवाई केली असून त्यांना फक्त मतदानावेळी सवलत दिलेली आहे . दोन जातीमध्ये तेढ निर्माण करुन अशांतता करणाऱ्या कंटकावरती कडक कारवाई करुन त्यांना तडीपार करणार असल्याचा सज्जड दमच दिला .

जवळा , आगलावेवाडी , भोपसेवाडी , तरंगेवाडी , बुरंगेवाडी या पाच गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून उमेदवारांनी लोकशाही मार्गाने प्रचार करुन मतदारांकडून मतदान करुन घ्यावे . अवैद्य मार्गाचा अवलंब करु नये.नगरिकांनी ही जागृत राहून आपल्या आजूबाजूच्या घडामोडीवरती लक्ष ठेवले पाहीजे.गावातील अवैध धंदे सुरु असतील तर तर्वरित माहीती सांगावी तात्काळ कारवाई करण्यात येईल . पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नागरिकांनी लोकशाही मार्गाने निर्भयपणे मतदान करावे . असे अवाहन शेवटी पो.नि.कोकणे यांनी केले . सदर बैठकीचे आयोजन जवळा ग्रामपंचायत कार्यालया समोर करण्यात आले होते .

या बैठकीस जवळा , तरंगेवाडी , बुरंगेवाडी आगलावेवाडी भोपसेवाडी गावातील प्रतिष्ठीत नागरिक , उमेदवार पोलीस पाटील यांच्यासह मोठ्यासंख्येने तरुण मतदार उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments