google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कडलास मध्ये तरुणाची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News

कडलास मध्ये तरुणाची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

 सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : अज्ञात कारणावरून ३४ वर्षीय तरुणाने रस्सीने लिंबाच्या झाडाला


गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार १२ जानेवारी रोजी साडेनऊच्या सुमारास कडलास ता.सांगोला येथील कोरडानदीकाठी उघडकीस आली आहे . शंकरराव बबनराव पवार रा . कडलास असे मृत तरुणाचे नाव आहे . शंकरराव पवार याने मंगळवार १२ जानेवारी रोजी स . ९ : ३० ते दु .१ च्या दरम्यान अज्ञात कोणत्यातरी कारणाने कोरडा नदीकाठी असलेल्याशेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला . या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली . याबाबत वडील बबनराव सोपान पवार रा . कडलास यांनी पोलिसात खबर दिली असून तपास पोलीस नाईक सुरेश कांबळे करीत आहेत .

Post a Comment

0 Comments