मुंबई : वृत्तसंस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ( आरबीआय ) बजाज ग्रुपचा भाग एक असलेल्या बजाज फायनान्स लिमिटेडला २.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे . वसुली ( रिकव्हरी ) आणि पैसे गोळा करण्याच्या ( कलेक्शन ) पद्धतीशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे .
बिगर बँकिंग वित्तीय कंपनी ( एनबीएफसी ) म्हणून आपले रिकव्हरी एजंट कर्जवसुली करण्याच्या प्रयत्नात ग्राहकांना त्रास देणार नाहीत किंवा धमकावणार नाहीत , याची खात्री करून घेण्यात अपयशी ठरल्यामुळे बजाज फायनान्स लिमिटेड , पुणे या कंपनीला आर्थिक दंड ठोठावण्यात आला असल्याचे आरबीआयने म्हटलेआहे . आरबीआयने जारी केलेल्य जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेच्या सूचनांचे पालन पुण्यातील बजाज फायनान्स कंपनीने केले नाही तसेच ' एनबीएफसी'साठ लागू केलेल्या फेअर पॅक्टिस कोडकडेही दुर्लक्ष होत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे . रिकव्हरी करताना ग्राहकांना त्रास दिल जात असल्याच्या अनेक तक्रारी आरबीआयकडे दाखल झाल्या आहेत दरम्यान , या कारवाईमुळे कंपनीने ग्राहकांबरोबर केलेल्या कोणत्याही व्यवहार किंवा कराराच्या वैधतेवरशंक घेण्याचा हेतू नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे . ही कारवाई नियामक अनुपालनातील कमतरतांवर आधारित असल्याचे बँकेने म्हटले आहे .


0 Comments