google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्पीड पोस्टाने क्रेडिट कार्ड पाठवून गंडा ? लाखांतील बक्षिसाचे आमिष : अर्ज पाठवून घेतली जाते गोपनीय माहिती

Breaking News

स्पीड पोस्टाने क्रेडिट कार्ड पाठवून गंडा ? लाखांतील बक्षिसाचे आमिष : अर्ज पाठवून घेतली जाते गोपनीय माहिती

 कोल्हापूर : स्पीड पोस्टाद्वारे ऑनलाईन विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या नावे असलेले क्रेडिट कार्ड व अर्ज पाठवून फसवणूक करण्याचा नवा फंडा सुरु झाला आहे . याचा अनुभव कोल्हापूरमधील स्टेशन रोडवरील पाटणकर पार्कमधील अजय जाधव यांना आला असून , त्यांनी बुधवारी ' लोकमत'ला याविषयीची माहिती दिली . तसेच शाहुपूरी पोलिसातही त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे .


घडले ते असे : ई - कॉमर्सद्वारे ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या देशातील बड्या कंपन्यांच्या नावाचा वापर करुन ही फसवणूक केली जात आहे . या कंपन्यांच्या नावे प्रथम तुम्हाला फोन करुन तुम्ही अमुक इतके लाख रुपये जिंकल्याचे सांगितले जाते.जाधव यांना ९ लाख रुपये जिंकल्याचा मेसेज आला होता . त्यावर विश्वास बसावा म्हणून स्पीड पोस्टाद्वारे त्या कंपनीचे क्रेडिट कार्ड आणि सोबत एक अर्ज चक्क त्यांच्या पत्त्यावरच पाठविण्यात आला . या अर्जात पॅनकार्ड , आधार क्रमांक , सही , बँक खात्याची इत्थंभूत माहिती भरून घेतली जाते . हा भरलेला अर्ज त्या कंपनीच्या पत्यावर पाठवावा , असे सूचविले जाते . हा अर्ज बघितल्यानंतर कोणाचाही

यावर बसतो , असाच तो तयार करण्यात आला आहे . क्रेडिट कार्डही बँकेसारखेच आहे . त्यामुळे प्रथमदर्शनी अर्ज व क्रेडिट कार्ड पाहून ज्येष्ठ नागरिक या नव्या फंड्याला फसण्याची शक्यता आहे . अशाप्रकारे स्पीड पोस्टाने क्रेडिट कार्ड व अर्ज अशिष जाधव यांना गुजरातवरून आला होता . परंतु , त्यांना शंका आल्यामुळे त्यांनी थेट शाहूपुरी पोलीसात तक्रार दिली . नागरीकांकडून बँक खात्याची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील पैसे हडप करण्यासाठी रोज नवे फंडे वापरले जात आहेत . नागरिकांनी अशा अमिषाला बळी पडू नये , असे आवाहन पोलिसांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments