BIG NREAKING : कोरोना लस निर्मितीच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग
पुणे : देशाला कोरोनाची लस तयार करून देणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठी दुर्घटना समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठी आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे.
सीरमच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून ती पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत
आग विझवायला साधारण एक ते दीड तास आणखी लागेल, अशी माहिती समोर येते आहे. ज्याठिकाणी लशीची निर्मिती केली जाते त्या बाजूला फारसं नुकसान झालेलं नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.


0 Comments