आमदार शहाजीबापू पाटील यांची महाराष्ट्र अल्पसंख्यांक कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती
सांगोला,दि.21 : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक कल्याण समितीच्या सदस्यपदी आमदार शहाजीबापू पाटील यांची नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सन 2020 21 या वर्षासाठी विधानमंडळाच्या अल्पसंख्यांक कल्याण समितीवर सदस्यपदी नियुक्ती केली असून या समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार अमीन पटेल हे काम पाहणार आहेत.
सदर समितीमध्ये आमदार शहाजी बापू पाटील, रवींद्र वायकर, मकरंद जाधव पाटील, संदीप क्षीरसागर, झीषण सिद्दिकी, काशिराम पावरा, कॅप्टन आर तमिल सेल्वन, कुमार आयलानी, नरेंद्र भोंडेकर, गीता जैन, अब्दुला खान दुर्राणी, डॉ वजाहत मिर्झा व महादेव जानकर आदी सदस्य म्हणून तर आमदार अमीन पटेल हे समितीचे प्रमुख राहणार आहेत.
0 Comments