google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघातात सहा . फौजदार जागीच ठार पत्नी , मुलासह पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

Breaking News

भीषण अपघातात सहा . फौजदार जागीच ठार पत्नी , मुलासह पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

 सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : भरधाव वेगाने जाणाऱ्या मॅक्स गाडीने समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी एस्टीम कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या सहा.फौजदाराचा जागीच मृत्यू झाला .


तर त्याची पत्नी , लहान मुलांसह बहीण , मेव्हणे त्यांचा मुलगा असे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . या अपघातात मॅक्स गाडीमधील चालकासह दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत . हा अपघात गुरुवार मध्यरात्री दीडच्या सुमारास दिघंची - महूद रोडवरील शेरेवाडी जवळ झाला . गणेश भीमराव जरांडे ( वय ३२ ) रा . कळस ता . इंदापूर जि.पुणे , सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय असे मृत सहा . फौजदाराचे नाव आहे . तर सोनाली गणेश जरांडे ( वय २५ ) , समर्थ गणेश जरांडे ( वय ३ ) रा.कळस ता.इंदापूर तर नानासाहेब सखाराम गाढवे ( वय ४२ ) , अर्चना नानासाहेब गाढवे ( वय ३२ ) , संग्राम नानासाहेब गाढवे ( वय १८ ) सर्वजण रा . रत्नपुरी , संग्रामनगर अकलूज ता . माळशिरस अशी जखमींची नावे आहेत . याबाबत अधिक माहिती अशी नवी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातील व कळस ता . इंदापूर येथील सहा . फौजदार गणेश भीमराव जरांडे , पत्नी सोनाली व मुलगा समर्थ असे तिघेजण व अकलूज संग्रामनगर मेहणे नानासाहेब सखाराम गाढवे , भगिनी अर्चना नानासाहेब गाढवे , भाचा संग्राम नानासाहेब गाढवे असे जरांडे व गाढवे कुटुंब एम.एच .१२ | सीडी ८८८५ या मारुती सुझुकी एस्टीम कारमधून मंगळवार १ ९ जानेवारी रोजी गणपतीपुळे येथे सहलीवर गेले होते . दोन दिवस कोकणातला निसर्गरम्य स्थळांचा आनंद लुटून जरांडे आणि गाढवे कुटुंब परतीच्या प्रवासाला अकलूजला निघाले होते . दरम्यान त्यांची कार गुरुवारी मध्यरात्री | दीडच्या सुमारास दिघंची- महुद रोडने येत असताना महुदकडून | दिघंचीकडे कांदा भरुन भरधाव निघालेल्या एम.एच २५ आर ००८१ या महिंद्रा मॅक्सने त्यांच्या कारला कटफळ ता.सांगोला येथील शेरेवाडीनजीक समोरून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला . अपघाताचा आवाज ऐकून |कारमध्ये अडकलेल्या जखमींना सिताराम खरात , महेंद्र खरात , शहाजी खरात इतर लोकांनी बाहेर काढले असता गंभीर जखमी चालक सहा.फौजदार गणेश जरांडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला . तर पत्नी अर्चना , मुलगा समर्थ , मेव्हणे नानासाहेब गाढवे , अर्चना गाढवे , संग्राम गाढवे यांचे हात - पाय फ्रेंक्चर झाले होते . डोक्यालाही गंभीर मार लागल्याने रूणवाहिकेतून तात्काळ उपचाराकरिता अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले . महिंद्रा मॅक्स मॅक्स पिकअपमधील जखमींची नावे समजू शकली नाही . याबाबत सिताराम खरात रा . शेरेवाडी ता . सांगोला यांनी पिकअप चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली असून तपास पोलिस उपनिरीक्षक प्रताप वसगडे करीत आहेत .

Post a Comment

0 Comments