google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निवडणूक , निकालाची उत्सुकता संपली आता उत्सुकता सरपंच आरक्षण सोडतीची

Breaking News

निवडणूक , निकालाची उत्सुकता संपली आता उत्सुकता सरपंच आरक्षण सोडतीची

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली . निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून , आता सरपंच कोण होणार , याविषयी गावागावात चर्चा सुरु झाल्या असून प्रशासनाने आधी जाहीर केलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे .


आता येत्या २७ जानेवारी रोजी तहसील स्तरावर व २ ९ जानेवारी जिल्हा स्तरावर महिला आरक्षण सोडत निघण्याची शक्यता आहे.निवडणूक , निकालाची उत्सुकता संपली असून आता ग्रामस्थांना उत्सुकता सरपंच आरक्षण सोडतीची लागली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे . महाआघाडी सरकारने सरपंचपदाची थेट निवड रद्द केल्याने ग्रामपंचायत सदस्यांना पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे . त्यामुळे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष शासनाकडून निधी देण्यात येतो . त्यानुसार तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे . त्यापैकी ५ लाख रुपयांचा निधी शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत प्राप्त झाला आहे . उपलब्ध निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसील कार्यालयांना निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी वितरित करण्यात आला आहे . तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च भागविण्यासाठी आवश्यक निधी मागणीच्या तुलनेत ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असला तरी , उर्वरित निधी शासनाकडून प्राप्त होणे अद्याप बाकी आहे .

Post a Comment

0 Comments