शहरात विविध ठिकाणी 217 पोल उभे करण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता
आमदार शहाजीबापू पाटील व नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या पाठपुराव्याला यश
सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला शहरातील विविध ठिकाणी विजेचे पोल उभे करण्याच्या कामास जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सदरच्या कामामध्ये एकूण 217 पोल उभे करण्यात येणार आहेत. हे काम 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत मुलभूत व कार्यात्मक अनुदानाच्या शिल्लक निधीतून होणार आहे. आमदार शहाजीबापू पाटील व नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या पोलच्या कामामुळे सांगोला शहराच्या वैभवामध्ये प्रकाश पडणार आहे.
यामध्ये विलास आप्पा लादे - शिवाजीनगर - 7 पोल, म्हाळाप्पा नामदेव नायकुडे-चिंचोली रोड - 7 पोल, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ - राऊत मळा- 7 पोल, उत्तम नामदेव बुरांडे - सावे रोड - 10 पोल, रमेश केराप्पा नलवडे - अलराईनगर - 10 पोल, भिवा शंकर साठे - साठे नगर - 2 पोल, नागेश मुरलीधर चांडोले - चांडोलेवाडी - 2 पोल, विष्णु विठ्ठल ढेरे - गावडे मळा - 5 पोल, नारायण परशुराम बामणे व प्रभू मेटकरी - बिलेवाडी - 15 पोल, ज्ञानेश्वर भास्कर पवार - वाढेगाव रोड - 2 पोल, सत्यभामाबाई जावीर - चांडोले सावंत वस्ती - 2 पोल, ईश्वर माने - सावे रोड - 1 पोल, कल्याण कांबळे - जांगळे वस्ती - 10 पोल, अरूण शिवलिंग चांदणे - जांगळे वस्ती - 5 पोल, कोपटेवस्ती ओढा ते सावे रोड - कोपटे वस्ती - 11 पोल, उध्दव विठ्ठल घाडगे - घाडगे वस्ती - 4 पोल, सुखदेव जांगळे ते सईद शेख - वासुद रोड - 10 पोल, महेंद्र रामचंद्र तोडकरी - वासुद रोड - 4 पोल, चांडोलेवाडी चौक ते नाला - चांडोलेवाडी - 7 पोल, महादेव वाघमारे ते डॉ. माळी - तळ्यातील राऊत मळा - 12 पोल, कडलास रोड ते भुईटे वस्ती - कडलास रोड - 10 पोल, पंढरपूर रोड ते सखाराम जानकर - पंढरपूर रोड - 10 पोल, विलास शेंबडे व वामन शेंबडे - शेंबडे वस्ती - 3 पोल, आप्पासाहेब पाटील ते श्रीकांत पाटील - पाटील वस्ती - 6 पोल, तानाजी पाटील घर ते ढोले मळा कोपटे वस्ती - कोपटे वस्ती - 20 पोल, मणेरी वस्ती ते कोपटे वस्ती - कोपटे वस्ती - 20 पोल, करंजाई देवी ते शिवाजी सावंत - जांगळे वस्ती - 8 पोल, राजू माने ते सोपान बनसोडे घरापर्यंत - भिमनगर - 4 पोल, उत्कर्ष शाळेजवळ नागनाथ गयाळी ते रवी चौगुले घराजवळ - उत्कर्ष शाळेजवळ - 3 पोल असे एकूण 217 पोल वरील ठिकाणी लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.
सदरच्या कामाचे प्रशासकीय मंजुरीसाठीचे प्रस्ताव तयार करणे व इतर कार्यलयीन कामासाठी विद्युत कनिष्ठ अभियंता राजकुमार सपाटे, वायरमन कृष्णा मोरे, मदतनीस आबा लवटे यांनी परिश्रम घे घेतले
0 Comments