google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रेल्वेतून शेतमाल वाहतुकीवर ५० टक्के मिळणार सवलत

Breaking News

रेल्वेतून शेतमाल वाहतुकीवर ५० टक्के मिळणार सवलत

 सांगोला , दि .२५ डिसेंबर किसान रेल्वेच्या माध्यमातून सर्वच प्रकारचा शेतमाल व फळांच्या वाहतुक खर्चावर पन्नास टक्के अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाने घेतला आहे


. आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत ऑपरेशन ग्रीन अंतर्गत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे . रेल्वेमंत्री पियुष गोयल , कृषीमंत्री नरसिंग तोमर , सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खा . रणजितसिंह निंबाळकर यांना दिलेल्या निवेदनाची दखल केंद्र सरकारने घेतली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार - सावंत यांनी दिली . या मागणीची केंद्र सरकारने दखल घेतली असून किसान रेल्वेतून सर्वच शेतीमाल व फळे पाठविल्यास शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात ५० टक्के सवलत मि ळणार आहे . यासंदर्भात अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने परिपत्रकदेखील जारी केले आहे . यामुळे सांगोला तालुक्यासह राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार सावंत यांनी दिली .

Post a Comment

0 Comments