google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायत बिनविरोध म्हणजे आरक्षित समाजाची फसवणूक, ओपन जागेवर आरक्षित लोकांनी निवडणूक लढवावी- नगरसेवक सुरज दादा बनसोडे सांगोला

Breaking News

ग्रामपंचायत बिनविरोध म्हणजे आरक्षित समाजाची फसवणूक, ओपन जागेवर आरक्षित लोकांनी निवडणूक लढवावी- नगरसेवक सुरज दादा बनसोडे सांगोला

सांगोला प्रतिनिधी  ; सांगोला तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागलेली आहे यामध्ये अनेक गावांमध्ये राजकीय नेते ठराविक नेतेमंडळी आप-आपसात बसून गाव बिनविरोध करण्याच्या तयारीत आहेत त्याचे प्रमुख कारण म्हणजे निवडणूक झाल्यावर सरपंच पदाचे आरक्षण असल्यामुळे गावातील पॅनल प्रमुख व नेतेमंडळी यांनी विचार करून निवडणूक झाल्यावर जर आपल्या गावातच एस सी एसटी ओबीसी आरक्षण पडल्यास पॅनल साठी केलेला खर्च वाया जाईल ह्या अनुषंगाने त्यांनी गाव बिनविरोध करण्याचे प्रस्ताव व हालचाली सुरू केलेल्या आहेत शिवाय आरक्षित प्रवर्गात अनेक जाती पोटजाती आहेत त्यांनी गाव बिनविरोध करून ठराविक आरक्षित समाजाच्या प्रवर्गाच्या वार्डात जाणीवपूर्वक मतभेद निर्माण केलेले आहेत व त्यातील ठराविक जातीलाच म्हणजे सांग कामी घटक व त्यांची हुजरेगिरी करणार्‍या व्यक्तीलाच सरपंच व सदस्य करण्याचे ठरविले आहे. ते जाणीवपूर्वक एस सी एसटी ओबीसी यांच्यामध्ये तुमचे समाजात बसून मिटवा अशा पद्धतीची नवीनच युक्ती काढून आरक्षित जागेसाठी जाणीवपूर्वक मतभेद करण्याचे काम व भांडणे लावण्याचे काम चालू केलेले आहे तरी अशा पद्धतीने ज्या गावांमध्ये हे प्रकार घडत आहे तेथील आरक्षित प्रवर्गातील लोकांनी व युवकांनी ओपन जागेवर सुद्धा उभे राहून या लोकांचा डाव हाणून पाडण्याचे काम करावे अशा पद्धतीचे आवाहन करण्यात आलेले आहे तसेच जुन्या पुढाऱ्याने स्वतः निवडणुकीतून माघार घेऊन तसेच आपल्या कुटुंबातील व पै पाहुण्यांना उमेदवारी न देता कर्तबगार व हुशार युवकांना संधी दिल्यास ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास काही हरकत नाही अशा पद्धतीचे मत आरपीआय आठवले गटाचे जिल्ह्याचे सर चिटणीस व सांगोला नगर परिषदेचे नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले

Post a Comment

0 Comments