सांगोला तालुक्यामधील ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून १६ तारखेला सरपंचपदाची आरक्षण सोडत असल्याने यामध्ये शासकीय नियमानुसार निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुसूचित जाती जमाती साठी सरपंचपद आरक्षित करण्यात यावे अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) च्या वतीने सांगोला तहसील कार्यालय येथे करण्यात आली आहे .तालुक्यामध्ये सध्या चर्चेचा विषय म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत . तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून येत्या १६ तारखेला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत करण्यात येणार आहे . यामध्ये शासकीय नियमानुसार व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अनुसूचित जाती जमाती साठी सरपंचपद आरक्षित करण्यात यावे .
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पारे या गावात अनुसूचित जाती जमाती साठी सरपंचपद आरक्षित होते परंतु यामध्ये प्रभाग रचनेत अनुसूचित जातीसाठी मतदारसंघ राखीव नसल्यामुळे त्या ठिकाणी सरपंचपद ओबीसीसाठी देण्यात आले होते . त्यामुळे अनुसूचित जाती जमातीचा एक सरपंच कमी होऊन झाला होता . असा प्रकार न होता निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे व शासकीय नियमानुसार अनुसूचित जाती जमातीसाठी सरपंचपद आरक्षित ठेवण्यात यावे अन्यथा आरपीआय आठवले गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सांगोला तालुका आरपीआय ( आठवले ) यांच्या वतीने देण्यात आला आहे . सदर निवेदन देतेवेळी आरपीआय युवक आघाडी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब बनसोडे , सांगोला तालुका अध्यक्ष खंडू सातपुते आदी उपस्थित होते .


0 Comments