google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील दुरुस्ती, देखभालीअभावी सीसीटीव्ही कॅमेरे एक वर्षापासून बंद

Breaking News

सांगोला शहरातील दुरुस्ती, देखभालीअभावी सीसीटीव्ही कॅमेरे एक वर्षापासून बंद


सांगोला शहरातील वर्दळीच्या ठिकाणी प्रमुख चौकात रस्त्यावरील गुन्हेगारीचा अचूक वेध घेणे, मुलींची छेडछाड, चोऱ्या, अपघातासह अनुचित प्रकारावर लक्ष ...

दुरुस्ती देखभालीअभावी सीसीटीव्ही कॅमेरे एक वर्षापासून बंद

सांगोला शहरातील वर्दळीच्या ठिकाणी प्रमुख चौकात रस्त्यावरील गुन्हेगारीचा अचूक वेध घेणे, मुलींची छेडछाड, चोऱ्या, अपघातासह अनुचित प्रकारावर लक्ष ठेवावे. यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले. त्यास प्रतिसाद देऊन सांगोला रोटरी क्लब, व्यापारी व सामाजिक संघटनेसह लोकवर्गणीतून लाखो रुपये खर्चून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, जयभवानी चौक, महात्मा फुले चौक, वासूद चौक, कडलास चौक, वाढेगाव नाका, भीमनगर, अहिल्यादेवी चौक अशा विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते.

शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रत्येक हालचालीवर करडी नजर असल्याने गुन्हेगारीला चांगलाच चाप बसला होता, तर पोलिसांना गुन्ह्याचा शोध घेण्यास मोठी मदत झाली होती.

गुन्ह्यांचा तपास करणे झाले कठीण

रोडरोमिओ, दंगेखोर, चोऱ्या व अवैध वाहतुकीसह भररस्त्यावर तलवारीने केक कापत साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसावर चांगले नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ शहरातील सर्वच कॅमेरे तांत्रिक बिघाड, देखभालीअभावी बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहरात दुचाकी चोरी, चोऱ्या, भांडण-तंटे आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. बंद कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना गुन्ह्याचा तपास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ते सुरू करावेत, अशी मागणी देणगीदारांनी केली आहे.

कोट :::::::::::::::::::::

मी पोलीस स्टेशनचा पदभार घेण्यापूर्वीच शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. पदभार घेतल्यानंतर कॅमेरे दुरुस्ती करण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु कोणीच पुढाकार घेण्यास तयार नाही. यासंदर्भात आ. शहाजीबापू पाटील यांना आमदार फंडातून निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी लेखी पत्रही दिले आहे. तरीही येत्या काळात बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे चालू करून प्रयत्न केले जातील.

- राजेश गवळी

पोलीस निरीक्षक, सांगोला

फोटो ओळ- सांगोला रोटरी क्लब, व्यापारी व लोकवर्गणीतून लाखो रुपये खर्चून शहरातील प्रमुख चौकात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे

Post a Comment

1 Comments

  1. सरकारी कारभार आहे.सरकार प्रत्येक क्षेत्रात अशीच टिवली बावळी कार्यवाही करत राहते. त्यांचा तो पिंडच आहे.उगाच का तुकाराम मुंढे साहेबांच्या १५ वर्षात १६ वेळा बदल्या होतात भन्नाट रस्त्त्यावरील स्पिड ब्रेकर असेच हटविले जातात.

    ReplyDelete