सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला शहरात शहीद स्तंभ , स्मारक उभारण्याकरिता जागा मिळावी याकरिता सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना शहीद अशोक कामटे सामाजिक auratdhaisane संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले . सांगोला शहर परिसरात शहिदांच्या स्मरणार्थ शहीद स्तंभ स्मारक , उभारणे करिता नगरपालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर शहीद स्तंभ , स्मारक उभारणीकरिता जागा मिळावी . जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शहरात शहीद स्तंभ स्मारक असल्याने त्या शहराच्या सौंदर्यात भर पडलेली असून व ते शहीद स्मारक उभारणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असून त्यानिमित्त देशाभिमानाची भावना अधिकाधिक जागृती होईल , शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना शहीद दिन व इतर देशभक्तीपर विविध कार्यक्रम गेल्या १२ उपक्रम राबवित असून शहीद स्तंभ उभारणीकरिता जागा उपलब्ध करून दिल्यास अशोक कामटे संघटना त्याच्या उभारणीस सर्वतोपरी सहकार्य करेल
. संपूर्ण भारतवासीय आपल्या घरांमध्येसुरक्षित आहेत याचे सर्वात मोठे श्रेय सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांचे असल्याने जवान आपल्या जिवाची पर्वा न करता सीमेवरती रक्षण करत आहेत , यामध्ये अनेक जवान शहीद होतात त्यांच्या स्मरणार्थ सांगोल्यात भव्य शहीद स्तंभ स्मारकास जागा नगरपालिकेने आरक्षित केलेल्या ठिकाणी मिळावी , अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे . या निवेदनाच्या प्रती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी सोलापूर , खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , आमदार शहाजीबापू पाटील , तहसीलदार अभिजीत पाटील यांनाही निवेदन दिल्याची माहिती शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने दिली आहे .


0 Comments