google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कर्जासाठी सातबारा उतारा हवा आहे....त्यासाठी आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही.

Breaking News

कर्जासाठी सातबारा उतारा हवा आहे....त्यासाठी आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही.

 सातबारा उतारा हवा आहे? तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही कारण..



shabdhrekha expresscom2h


कर्जासाठी सातबारा उतारा हवा आहे....त्यासाठी आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण राज्यातील सुमारे २३ बॅंकांबरोबर भूमी अभिलेख विभागाने सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे या बॅंकांना आता ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बॅंकांमध्ये कर्जासाठी अर्ज केल्यानंतर त्यासोबत सातबारा उतारा जोडण्याची गरज राहिलेली नाही.



पुणे - कर्जासाठी सातबारा उतारा हवा आहे....त्यासाठी आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण राज्यातील सुमारे २३ बॅंकांबरोबर भूमी अभिलेख विभागाने सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे या बॅंकांना आता ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बॅंकांमध्ये कर्जासाठी अर्ज केल्यानंतर त्यासोबत सातबारा उतारा जोडण्याची गरज राहिलेली नाही.


महसूल विभागाने राज्यातील सर्व जमिनींचे अधिकार अभिलेख म्हणजे सातबारा उतारा संगणकीकृत करून उपलब्ध करून दिले आहेत. राज्यातील २ कोटी ५३  लाख सातबारा उताऱ्यांपैकी २ कोटी ५० लाख ६० हजार सातबारे डिजिटल स्वाक्षरीत केले आहेत.  त्यामुळे त्यांची ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. हे संगणकीकृत अभिलेख सर्व बॅंका व वित्तीय संस्थांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे त्यासाठी बॅंकेला जमाबंदी आयुक्तांशी सामंजस्य करार करावा लागतो. त्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने बॅंकिंग पोर्टल (https://g२b.mahabhumi.gov.in ) विकसित केले आहे. त्याद्वारे राज्यातील कोणत्याही गावचे डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारे व ऑनलाइनला नोंदविलेले फेरफार बॅंक अथवा वित्तीय संस्थांना प्रत्येकी १५ रुपये नक्कल फी भरून ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. या पोर्टलची सेवा मिळण्यासाठी आजपर्यंत २३ बॅंकांनी सामंजस्य करार केले आहेत, अशी माहिती राज्याचे ई-फेरफार समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.


- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


या बॅंकांनी केले आहेत करार

महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, एच.डी.एफ.सी.बॅंक, आय.सी.आय.ई.आय. बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक, पंजाब ॲण्ड सिंध बॅंक, जनता सहकारी बॅंक सातारा, आय.डी.बी.आय. बॅंक, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक


Edited By - santosh sathe

Post a Comment

0 Comments