google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धायटीत चौघांवर प्राणघातक हल्ला सांगोला

Breaking News

धायटीत चौघांवर प्राणघातक हल्ला सांगोला

 धायटीत चौघांवर प्राणघातक हल्ला सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) दवाखान्याच्या दरवाजातून जावू न दिल्याच्या कारणावरून चौघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार , लोखंडी गज व काठीने मारहाण केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास धायटी ता.सांगोला येथे घडली .


फिर्यादी भगवान मोहन भोसले रा.घायटी ता . सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी व त्याचा चुलत भाऊ नितीन उर्फ लक्ष्मण कृष्णदेव भोसले याची पत्नी सारिका हिस धायटी येथील डॉ.साळुखे यांचे दत्त सरस्वती हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेला होता . फिर्यादीच्या भावकीतील प्रविण भारत भोसले याने दवाखान्याच्या दरवाज्यात उभा राहून नितीन भोसले याचा रस्ता अडवून प्रवीण यास बाजूला सरक असे दरडावून बोलला . तेव्हा प्रवीण याने त्याचा राग मनात धरून नितीन भोसले यास थांब तुझ्याकडे बघतो असे म्हणून निघून गेला . फिर्यादीचा चुलत भाऊ प्रताप विश्वंभर भोसले , संभाजी प्रभाकर भोसले हे २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास दवाखान्याबाहेर थांबले असता प्रवीण भारत भोसले , शिवाजी विठ्ठल मोळक , अभिजीत हरी पाटील , महादेव बाळू मोळक , विठ्ठल बाळू मोळक , शिवाजी भोसले सर्व रा . धायटी ता . सांगोला यांनी आपसात संगनमत करून प्रवीण भोसले याने हातातील ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात तलवारीने पाठीमागून वार केला . तसेच फिर्यादीला सोडविण्यासाठी प्रताप भोसले . लक्ष्मण भोसले , संभाजी भोसले आले असता त्यांना शिवाजी मोळक याने त्याच्या हातातील दगडाने प्रताप भोसले याला मारहाण केली . तर अभिजित पाटील याने हातातील लोखंडी गजाने प्रताप यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गजाने मारहान केली . याप्रकरणी भगवान मोहन भोसले यांनी सहा जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पुढील तपास  प्रताप वसगडे करीत आहेत .पसई

Post a Comment

0 Comments