वाडेगावकरानाही बसलाय अतिवृष्टीचा फटका माण नदीला आला महापूर
सांगोला /प्रतिनिधी: सोलापूर जिल्हयात अनेक भागात पावसाने अक्षरशा झोडपून काढले असून शहरातील ग्रामीण भागातील परिसर जलमय झाल्याचे चित्र दिसून येत होते सांगोला तालुक्यामध्ये ग्रामीणभागामध्ये नद्या नाले ओढे तुडुंब भरून वाहत होते माण कोरडा अफ्रुगा नदीलाही महापूर आल्पाने नागरिकाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता
वाढेगांव- येथील माण नदी तडुंब भरून वाहत असल्यान पाणी सांगोला वाढेगांव रस्त्यावरून वाहत असल्याने मंगळवेढा मेडशिगी आलेगांव वाणीचिंचाळे लक्ष्मीदहिवडी आदी गावाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहन धारक अडकून पडली होतीवाडेगाव येथील माण नदीला महापूर आलेलेआल्याने रस्त्यावर जवळपास तीन ते चार फूट पाणी असल्याने लोकांना मोटरसायकल वरून जाणे वा येणे अडचणीचे ठरले होते काल दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती काल सकाळपासून दिवसभर पावसाच्या पाण्याचा ओघ वाढत चालला असून सांगोल्या कडून येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच वाहने कांही वेळ ठप्प ठेऊन वाढेगावकराना नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतकितेचा इशारा दिला
काल दिवसभर पावसाची रिमझिम सुरु असल्याने पाण्याच्या प्रवाहाचावेग मोठ्या प्रमाणात वाढत होता वाढेगावातील बंधाऱ्याची दरवाजे टाकल्याने बंधार्यावरून पाणी ओसंडुन वाहत होते त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेतात ही पाणी शिरल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सध्या कोरोनाने नागरिक मोठ्या प्रमाणात हतबल झालेले असतानाच निसर्गाचा कोप झाल्याने रोतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी वाहत आहे
बऱ्याच वर्षानी माण नदीला महापूर आल्याने आबालवृद्धांनी नागरिकांनी महिलांनी पाणी बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नद्या-नाले ओसंडून वाहत असतानाचे चित्र नागरिक व महिलांनी पाहताच त्यांच्या चेहर्यावर आनंदाने हसू फुलल्याचे चित्र पहावयास मिळाले होते ज्यांची शेती घरे पाण्याखाली गेली होती ते शेतकरी मात्र पुरामुळे भयभीत झाले होते हवामानाच्या अंदाजानुसार अजून दोन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचे सांगण्यात आले असून पावसाच तडाखा सुरु झाल्यास नदीकाठच्या शेतक ऱ्यानी सावध रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शेभरकर प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे
0 Comments