ब्रेकिंग बातमी ; एका तरुणाची गोळ्या घालून हत्या ; जत तालुक्यामधील घटना !
पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असणारा धनाजी नामदेव मोटे रा . कंठी ता . जत याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोके दगडाने ठेचून निघूनपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे . गुरूवारी मध्यरात्री कंठी ता . जत येथील मरगुबाई देवीच्या मंदिराजवळ ही घटना घडली . खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही . घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , धनाजी मोटे यांच्या वर हत्यारांची तस्करी , यासह अनेक प्रकारचे गुन्हे जत पोलिस ठाण्यात दाखल आहेत . सांगली शहर पोलिसात ही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत . गुरूवारी मध्यरात्री च्या सुमारास धनाजी मोटे याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोक्यारत दगड घालून निघृनपणे खून केला . या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान , शुक्रवारी पहाटे घटनास्थळी मृतदेहाजवळ दुचाकी व बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत . अद्याप खूनाचे कारण व मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही . तर जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले , पोलिस निरीक्षक उत्तम जाधव व सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे . पोलिसांकडून तपासाच्या अनुषंगाने शोघ घेणे चालू आहे .
0 Comments