google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in

Breaking News

 

शासनाने "ओला" दुष्काळ जाहीर करावा~ डॉ बाबासाहेब देशमुख 

कोळा/वार्ताहार सांगोला तालुक्यात अनेक गावात पडलेल्या पावसामुळे नदीला ओढ्याला आलेल्या महापुरामुळे अतिवृष्टीमुळे डाळिंब मका,सूर्यफूल, फळपिके, पेरणी केलेली ज्वारीची पिके व शेतजमिनी यांचे शेतामध्ये काढणीसाठी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत तसेच अनेक पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेतकरी संकटात सापडला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ "ओला दुष्काळ" जाहीर करावा.अशी मागणी भाई गणपतराव देशमुख यांचे नातु डॉ बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.

 संपूर्ण सांगोला तालुक्यातच या पावसाने कहर केला असून जवळा कडलास संगेवाडी मांजरी बामणी घेरडी पारे, हंगिरगे,नराळे,डिकसळ, जवळा, कडलास, वाणीचिंचाळे, वाकी ,आलेगाव ,मेडशिंगी, वाढेगाव कोळा जुनोनी नाझरे चोपडी महूद वाकी शिवने कटफळ तसेच मा नदीकाठच्या गावातील ओढे-नाले, ताली,बंधारे,तलाव पाण्याखाली आले आहेत. पाणी तुडुंब भरून वाहत आहे. शेतकरी संकटात सापडला असून, त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.तसेच सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी अशी आमची मागणी आहे. 

राज्यात करोनाचे संकट आहेत. त्यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झालेले असताना अतिवृष्टीचा पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळे सांगोल तालुक्यातील गोरगरीब शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे. हाती आलेले पिक वाया गेले. अनेक शेतकऱ्यांचे डाळिंब पीक पाण्याखाली गेले. अन्य पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

 शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मदत केल्यास शेतकऱ्यांना थोडाफार हातभार लागेल असे बाबासाहेब देशमुख यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

0 Comments