सांगोला/ साप्ताहिक शब्दरेखा एक्स्प्रेस :सांगोला तालुक्यातील डिओकसळ येथील ग्रामस्थांनी डिकसळ ते आवंढी रस्त्यावर नागरिकांना जाण्या येण्यासाठी रस्ताच नसल्याने आज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे डिकसळ ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी वारंवार तक्रार देऊनदेखील अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे मौजे डिसकळ गायकवाडवरती , मेसकरवरती पवार इंगोलवस्ती , भुसनरवस्ती , निळेवस्ती , करंडेवस्ती , आटपाडकर , कोरे , उजनीकर वस्तीवरील ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले असून पुर्वीपासून डिसकळ ते आवंढी या रस्त्यावरुन परंपरागत या रस्त्याने जात येत होते आणि येतात . हा रस्ता ब्रिटीश कालीन नकाशामध्ये नमुद आहे . पंरतु हा रस्ता डिकसळमधुन , आवंढी व अतराळवरील वाडी वस्तीवर अंदाजे ७०० इतकी लोकसंख्या असून त्यांना डिकसळ येथे येणे जाणेसाठी अडथळा होत आहेे
या रस्त्याच्या कामासाठी तहसीलदार सो सांगोला , तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांना वारंवार लेखी तक्रारी देऊन देखील अदयापर्यत कार्यवाही केलेली नाही.तसेच अर्ज करुन सुध्दा संबधीत अधिकारी यांनी संबंधीत रस्त्यास भेट दिलेली नाही . तेथील नागरिकांना रस्ताच नसल्याने जाण्यायेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे डिकसळ येथील राजाराम बाबू भुसनर या आजारी इसमांचा १५ दिवसापूर्वी दवाखान्यास जाणेसाठी रस्ताच नसल्याने सदर इसमाचा मृत्यू झाला येथील रस्त्यावर कांही शेतक ऱ्यांनी जाणुन बुजुन अडथळा निर्माण केलेला आहे . याचीही चौकशी व्हावी . सदर रस्त्याची लांबी ४ कि.मी असून त्यामध्ये दोन कि.मी अंतराचा रस्ता डिकसळ गामचायतीच्या निधीतुन तयार केलेला आहे . उर्वरीत दोन कि.मी.च्या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीकडे रस्त्याच्या नावे निधी शिल्लक आहे परंतु अधिका - यांच्या दुर्लक्षपणामुळे रस्ता अपुर्ण राहिलेला आहे . यांची वारंवार शासन दरबारी दाद मागीतली असूनदेखील कुणीही दखल घेतली नाही . म्हणुन सात दिवसाचे आत सदर रस्त्याबाबतची कार्यवाही चालु न केलेस डिकसळ वस्तीवरील ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर आज मंगळवार दिनांक २७ पासून आमरण उपोषण करीत आहेत यामध्ये डिकसळ ग्रा.प चे उपसरपंच चंद्रकांत करांडे अशोक करताडे मधुकर करताडे संतोष पवार साहेब राव इंगोले भगवान गोंड सुनील इंगोले वैभव इंगोले सिद्धनाथ दिगंबर इंगोले रावसाहेब निळे रंणजीत कुमार गंगणे अजय इंगोले विठोबा पवार धनाजी इंगोले शरद पवार संजय मेसकर नवनाथ इंगोले शिवाजी पवार मारुती दंगोले आदी ग्रामस्थ तहसील समोर उपोषणास बसलेले आहेत


0 Comments