मास्क/रुमाल न वापरणा-या व्यक्तींवर १०० ऐवजी ५०० रु. इतकी दंडात्मक कारवाई बाबत जिल्हाधिकारी यांचे सुधारित आदेश !
ज्याअर्थी राज्य शासनाने कोरोना विषाणुचा ( कोव्हीड -19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये दि .13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3 व 4 मधील तरतुदीची अंमलबजावणी याची अधिसुचना निर्गमित केली आहे . ज्याअर्थी सद्यपरिस्थितीमध्ये कोरोना या विषाणूचा संसर्ग व वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता , त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग रोखणेकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे .
ज्याअर्थी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 ( m ) नुसार कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना आवश्यक वाटतील अशा व इतर उपाययोजना करणे आणि कलम 64 नुसार आपत्तीस प्रतिबंध करणेची किंवा तिची तीव्रता कमी करणेच्या प्रयोजनार्थ नियम तयार करणेचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असलेची तरतूद करण्यात आली
| Add caption |
ज्याअर्थी वाचा क्र 05 अन्वये सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्ग रोखणेकामी सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर कायम रुमाल / मास्क वापरणे , फिजिकल डिस्टन्स पाळणे , सार्वजनिक ठिकाणी न थुकणे , सार्वजनिक ठिकाणी दारू , पान , तंबाखूचे सेवन न करणे इत्यादी बाबी बंधनकारक असून सदर बाबींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करणेबाबत आदेशित करणेत आले आहे .
ज्याअर्थी संदर्भीय पत्र क्र . 06 अन्वये पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भावाची वाढती परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर रु . 100 / - दंडाऐवजी रु . 500 / - इतकी वाढीव दंडात्मक कारवाई करणेबाबत सुधारित आदेश निर्गमित करणेस विनंती केली
त्याअर्थी मी मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर असा आदेश देतो की , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 ( m ) आणि कलम 64 मधील तरतूदीन्वये सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकामी सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क / रुमाल न वापरणाऱ्या व्यक्तींवर रु . 500 / - इतकी दंडात्मक कारवाई करणेत यावी . सदर आदेशाची अमंलबजावणी वाचा क्र . 5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे संबधीतांना करणे बंधनकरक आहे .



0 Comments