Breaking News

आनंदराव मेटकरी मित्र परिवार यांच्याकडून प्रा. बाळासाहेब सरगर यांना होंडा शाईन गाडी भेट

 आनंदराव मेटकरी मित्र परिवार यांच्याकडून प्रा. बाळासाहेब सरगर यांना होंडा शाईन गाडी भेट

सांगोला/प्रतिनिधी- १९ ऑक्टोबर रोजी यशवंत सेनेचे सांगोला तालुका अध्यक्ष मा.श्री. आनंदराव मेटकरी मित्र परिवार यांच्याकडून सम्राट सेना सरसेनापती प्रा. बाळासाहेब सरगर यांना होंडा शाईन कंपनीची गाडी भेट देण्यात आली. सदर कार्यक्रमास विज्ञान महाविद्याल सांगोलाचे प्राध्यापक मा.श्री. धनाजी भानवसे, प्रा. निलेश रसाळ, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते व धडाडीचे कार्यकर्ते मा. श्री. देवा(भाऊ) लवटे, घेरडी गावचे युवा नेते मा.सतीश(भाऊ) मोटे, एखतपूर गावचे दोलतडे बंधू व अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. सामाजिक काम करताना येणारी अडचण प्रत्येक वेळेस लक्षात आल्यामुळे व सामाजिक कामाला गती यावे या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याची माहिती आनंदराव मेटकरी यांनी यावेळेस दिली. सध्या सामाजिक  क्षेत्रात  काम करणाऱ्या तरुणांची संख्या कमी असल्यामुळे सामाजिक आंदोलने व चळवळी यांचा प्रभाव कमी होत चालला आहे.


त्यामुळे अशा चळवळीत काम करणाऱ्या तरुणांना बळ मिळावे व सामाजिक चळवळ वेगाने वाढावी या उद्देशातून असे उपक्रम मोठ्या प्रमाणात व्हावेत व त्यांना प्रोहत्सान लोकांनी द्यावे असे आंनदराव मेटकरी यांनी यावेळेस सांगितले.  

Post a Comment

0 Comments