google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in

Breaking News

 मंदिरे उघडाम्हणणाऱ्यांचं काय जातंय : मुख्यमंत्री त हो प्रत्येक निर्णय सावधपणे घ्यावा लागेल मुंबई : देशभरात मंदिरे सुरू झाली आहेत . मात्र आम्ही मंदिरे आणि जीमबाबतचा निर्णय अद्याप घेतला नाही . काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत आहेत . मंदिरे उघडायची मागणी करणाऱ्यांचं काय जातंय , जबाबदारी आमची आहे . जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे , लोकल आणि जीमसंदर्भातील निर्णय आपण अजून घेतलेला नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले . कोरोना अजून आपल्यातून गेला नाही . जगात काही देशांत तर याची दुसरी लाट आली आहे . त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागत आहे . सुरू केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही , याचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्र्यांनी जनतेला लॉकडाऊन लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका , शिस्त पाळा , आरोग्य सांभाळा , असे आवाहनही केले



Post a Comment

0 Comments