तालुक्यातील पशुपालकांनी आपल्या पशुमध्ये लम्पी डिसीज ची लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधा ; डॉ. सय्यद तालुका पशुधन अधिकारी

सध्या सोलापूर जिल्हात व सांगोला तालुक्यात लंम्पी स्किन डिसीजचा प्रादुर्भाव दिसून येत आहे . या आजारामध्ये पशुंच्या अंगावर गाठी येणे , ताप येणे , सांधे सुजने , चारा कमी खाणे इत्यादी कमी जास्त प्रमाणात लक्षणे दिसून येतात . परंतू या आजारामध्ये मरतूक अत्यल्प अथवा नाहीच .
या आजाराबाबत मा.अनिल मोटे सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद , सोलापूर यांनी दि .०६ / १० / २०२० रोजी व त्यापूर्वीही वारंवार दुरध्वनीवरुन व प्रत्यक्ष बैठक व आढावा घेऊन उपचार आणि लसीकरण मोहिम घेण्याच्या सक्त सुचना दिल्या . डॉ.नवानाथ नरळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी , जिल्हा परिषद , सोलापूर यांनी तालुक्यातील विविध गावाना भेटी देऊन लंम्पी स्किन डिसीज आजाराबाबत पशुवैद्यकिय संस्था प्रमुखांना मार्गदर्शन केले .
तसेच पशुपालकांना मार्गदर्शन करुन या आजाराबाबत न घाबरण्याचे आवाहन केले आहे . तालुक्यातील २४ संस्थेत पुरेसा औषधसाठा असून , औषध उपचार व लसीकरण मोफत करण्याचे आदेश सर्व संस्था प्रमुखांना दिले आहेत.तसेच तालुक्यातील महुद बु . , महिम , मेथवडे , मांजरी , वाणी चिंचाळे , घेरडी , पारे , डिकसळ , राजूरी , जुजारपूर , जवळा , सोनंद , येथील लागण झालेल्या पशुंना तीन ते चार दिवसाच्या उपचाराने पशुधन बरे झालेली आहेत .
0 Comments