चिखलमय रस्त्यामुळे नवीन वसाहतीतील नागरिक त्रस्त ; नगरपालिका प्रशासनाचे डोळे कधी उघडणार त्रस्त नागरिकांचा सवाल !
सांगोला शहरातील वार्ड नंबर १ मध्ये असणाऱ्या नवीन वसाहती जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात चिखलमय होत आहे. मात्र या रस्त्याकडे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे लक्ष नाही. या रस्त्याने दररोज वसाहतीत राहणारे शेकडो नागरिक ये जा करतात या नागरिकांना या ठिकाणच्या चिखलाच्या रस्त्यातून वाट काढावी लागते. त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मतदानावेळी ना ना प्रकारची आश्वासने या मतदार राजाला दिली जातात मात्र एखादा निवडून आले कि याच मतदार राजाला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडतो.नागरिकांना विज,रस्ते,पाणी, स्वच्छता या मुलभूत सेवा देणे गरजेचे असताना या सेवा पुरवण्याकडे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.आणि या रस्त्यावर तातडीने मुरुम टाकून नागरिकांसाठी रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी येथील रहिवासी नागरिकांमधून केली जात आहे.
0 Comments