October 19, 2020
शब्दरेखा एक्सप्रेस

हे देखील वाचा
सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच असंतोष; उद्धव ठाकरेंनी जाग्यावर येऊन आमचं नुकसान पाहावं
मंत्र्यांनो नुसते दौरे नको, तात्काळ भरीव मदत द्या; शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरच्या लढाईचा राजू शेट्टींचा इशारा
पावसाचा तडाखा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात; असा असेल दौरा
सोलापूर-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक सुरू; चार दिवसानंतर बेगमपूर पुल वाहतुकीसाठी खुला
Share post
सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आठवडी बाजार सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे.राज्यातील ग्रंथालय, आठवडी बाजार, गुरुवारपासून सुरू झाले आहेत. याशिवाय मेट्रो रेल्वे सेवा रुळावर येत आहे. सरकारी आणि खासगी ग्रंथालय सुरू करण्यासाठीची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे.
मंगळवेढा नगरपरिषद हद्दीतील आठवडा बाजार आज सोमवार दि.19 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील आठवडी बाजार आणि जनावरांचे बाजारही उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला आता चांगला दर मिळणार आहे. कंटेन्मेंट क्षेत्रात मात्र याची परवानगी असणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे मागील सहा महिन्यांपासून बंद असलेले ग्रामीण भागातील व्यवहार सुरू होणार असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन सरकारने मंदिरे तूर्तास न उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ती उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. Farmers’ vegetables will now fetch better prices; The market will fill the week from today
प्रतिबंधित क्षेत्रातील उद्योग व्यवसाय बंदच राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था ३१ ऑक्टोबर पर्यंत बंद राहतील. मात्र,पदव्युत्तर व संशोधनात्मक शिक्षणासाठी पीएच.डी. विद्यार्थ्यांना ग्रंथालयांचा वापर करण्याची मुभा देण्यात देण्यात आली आहे.
दुसरीकडे, शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारीसाठी शाळांत ५० टक्के शिक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे नियम पाळून सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्रात मात्र ती इतक्यात सुरू होणार नाहीत. मनोरंजन केंद्रे सुरू करण्यास मात्र परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना बाबत शासनाने दिलेल्या नियमांचे फळ विक्रेता, भाजी पाला विक्रेते व इतर विक्रेते यांनी पालन करावे असे आवाहन मंगळवेढा नगरपालिकेचे कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी केले आहे.


0 Comments